तीन अल्पवयीन मुलांच्या आत्महत्यांनी खळबळ

राजस्थानातल्या बारमेर जिल्ह्यातील प्रकार
बारमेर – राजस्थानातल्या बारमेर जिल्ह्यातील स्वरूप का ताला नावाच्या गावात तीन अल्पवयीन मुलांनी एकाच झाडावर गळफास लाऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघड झाल्याने त्या जिल्ह्यात खळबळ माजली आहे. गेल्या 12 तारखेला हा प्रकार घडला असून यात दोन मुली असून एका मुलाचाही यात समावेश आहे. या दोन मुली अनुक्रमे 12 आणि 13 वर्षांच्या असून त्या दलित समाजाच्या आहेत. तर मुलगा 17 वर्षांचा असून तो अल्पसंख्य समाजाचा आहे. गावापासून सुमारे 1 किमी अंतरावरील झाडाला त्यांनी एकाच वेळी गळफास घेतला असल्याचा संशय आहे.

या दोन मुली एकमेकांच्या चुलत बहिणी आहेत. त्यांच्यापैकी एकीच्या वडिलांनी सांगितले की आपली मुलगी 11 तारखेल रात्री नेहमीप्रमाणे आपल्या खोलीत झोपायला म्हणून गेली त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिचे प्रेतच झाडाला लटकलेले आढळले. या प्रकरणात खुनाचा गुन्हा नोंदवला गेला पाहिजे असे मत त्यांनी दिले आहे. अल्पसंख्य मुलाच्या वडिलांनी मात्र ही आत्महत्येचचीच केस असावी असा कयास व्यक्त केला आहे. ते म्हणाले की आमचा मुलगा घरात राहातच नव्हता. तो इतरत्र कोठेही काम करून स्वत:पुरते मिळवून खात होता. कित्तेक दिवस तो घरीच आला नव्हता. त्याच्यावर ही वेळ कशाने आली असावी याचा आपल्याला काही अंदाज नाही असे त्यांनी म्हटले आहे.पोलिसांनी जादा पथके नेमून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)