…तीने थॅक्‍स म्हणताच त्याने घेतला किस

…तीने थॅक्‍स म्हणताच त्याने घेतला किस
पुणे,दि.15- एका इंजिनिअरींगच्या तरुणीला जवळ ओढून किस करत तीचा विनयभंग केल्याचा प्रकार लष्कर परिसरात घडला. याप्रकरणी एका 42 वर्षीय व्यक्तीवर लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस त्याचा कसून शोध घेत असून सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहे.
एका 21 वर्षीय तरुणीने दिलेल्या फिर्यादीनूसार ती इंजिनिअरींगचे शिक्षण घेत असून बालेवाडे येथे रहाते. ती लष्कर परिसरात एका कामासाठी आली होती. तीला पत्ता सापडत नसल्याने तीने मित्राला मोबाईलवरुन कॉल करण्याचा प्रयत्न केला. मात्र मोबाईल स्विच ऑफ झाला. यामुळे तीने रस्त्याने जाणाऱ्या एका व्यक्तीस कॉल करण्यासाठी मोबाईल मागितला. त्याने मोबाईल दिल्यावर तीने मित्राला कॉल करुन पत्ता विचारला. यानंतर मोबाईल परत केल्यावर तीने थॅक्‍स म्हणण्यासाठी हात पुढे केला. यावेळी त्याने तसाच तीचा हात पकडून तीला जवळ ओढले. यानंतर जबरदस्तीने तीला किस करुन विनयभंग केला. घाबरलेल्या अवस्थेत फिर्यादीने तेथून पळ काढला. यानंतर मित्राला याची माहिती देऊन तीने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांना आरोपीचा मोबाईल नंबर मिळाला असून त्याचा कसून शोध घेतला जात आहे. याप्रकरणाचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक गुरव करत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)