नवी दिल्ली – ज्या भागात अफस्पा म्हणजेच लष्कराच्या विशेषाधिकाराचा कायदा लागू आहे त्या भागातील घटनांबद्दल जबाबदार धरून गुन्हे करण्यात आलेल्या सुमारे तीनशे लष्करी जवान आणि अधिकाऱ्यांनी या गुन्हा नोंदीच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या याचिकेची दखल घेतली असून त्यावर 20 ऑगस्ट रोजी सुनावणी घेण्याचे घोषित केले आहे. अशांत भागात आपले कर्तव्य बजावित असताना झालेल्या प्रकारांबद्दल या अधिकारी आणि जवानांवर गुन्हे दाखल करणे हे कायद्याच्या विरोधात आहे असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

अफस्पा कायद्याने अशांत टापुतील जवानांना विशेषाधिकार दिले गेले आहेत. पण तरीही त्यांच्यावर अशा प्रकारचे गुन्हे नोंदवण्यात आल्याने जवान आणि अधिकाऱ्यांच्या मनोधैर्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे गाऱ्हाणे यात मांडण्यात आले आहे. मणिपुर, आसाम सारख्या राज्यांमध्ये जवानांवर खोट्या चकमकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यावरून जवानांमध्ये अस्वस्थता आहे. यातील काही गुन्हे खुद्द सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळेच लागू केले गेले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)