तीनपट आकारणीची थकबाकी 133 कोटींची

थकबाकी भरल्यानंतरच लागणार एकपट कर

पुणे – शहरातील 1 हजार चौरस फूटापेक्षा कमी अनधिकृत बांधकाम असलेल्या बांधकामांना आता एकपट दरानेच मिळकत कर आकारणी होणार आहे. या सुविधेचा लाभ सुमारे 13 हजार 996 मिळकतधारकांना मिळणार असला तरी त्यांना या पूर्वीची तीनपट दराने असलेली तब्बल 133 कोटी 47 आख रुपयांची थकबाकी आधी भरावी लागणार आहे. यात सर्वाधिक 9 हजार मिळकती असून त्यांची थकबाकी ही 59 कोटी रुपयांची आहे.

-Ads-

महापालिकांच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामांची संख्या वाढत असल्याने राज्य शासनाने 2008 मध्ये कायद्यात बदल करून तिप्पट दर आकारणीची तरतूद प्रस्तावित केली होती. त्यानुसार कर आकारणी केली जात आहे. त्यातच ही तिप्पट आकारणी केल्याने अनेक मिळकतधारक कर भरत नाहीत. त्यामुळे त्यांच्या थकबाकीवर वर्षाला जवळपास 20 टक्‍के व्याज वाढते. ही थकबाकी कोट्यवधींच्या घरात आहे. अनेकदा बांधकाम व्यावसायिकांकडून फसवणूक झाल्याने ग्राहकांनाच हा दंडाचा भार सहन करावा लागतो. तसेच दंडाची रक्‍कम अधिक असल्याने अनेक नागरिक कर लावून घेण्यासाठी येतच नाहीत. परिणामी, महापालिकेचे उत्पन्नही बुडते. त्यामुळे राज्य शासनाने या बाबींचा विचार करून 2017 मध्ये या कायद्यात सुधारणा केली. तसेच जून-2017 पासून 600 चौरस फुटांच्या आतील मिळकतींना एकपट कर आकारणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शासनाने हा अधिकार महापालिकेस दिल्याने प्रशासनाने दर निश्‍चित करण्यासाठीचा प्रस्ताव ठेवत, पूर्वीचा दंड जैसे थे ठेवण्याची मागणी केली होती. मात्र, समितीने आपले अधिकार वापरत उपसूचना देत 600 ऐवजी 1 हजार चौरस फुटांपर्यंतच्या निवासी मिळकतींना एकपट तर, त्यापुढील आकाराच्या मिळकतींना दीडपट दराने शास्तीकर लावण्याचा निर्णय घेतला. स्थायी समितीचा हा प्रस्ताव मुख्यसभेतही नुकताच मंजूर झाला असून, मुख्यसभेत सर्व निवासी मिळकतींना हा कर एकपट करण्याच्या उपसूचना देत मंजूर करण्यात आला आहे.

आधी थकबाकी भरावी लागणार
महापालिकेने निवासी मिळकतधारकांना ही सवलत देण्याचा निर्णय घेतला असला तरी ज्यांना कर एकपट करून घ्यायचा आहे. त्यांना या पूर्वीची तीन पट दराने असलेली थकबाकी भरणे बंधनकारक आहे. शहरात अशा तीन पट कर आकारणी झालेल्या 17 हजार मिळकती होत्या. त्यातील 600 चौरस फूटांपेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या मिळकतकर धारकांनी थकबाकी भरून कर एकपट केला आहे. तर आणखी 14 हजार मिळकती आहेत. या मिळकतींची थकबाकी 133 कोटी 47 लाख 18 हजार 451 रुपयांची आहे. त्यात 600 चौरस फूटांपेक्षा कमी आकाराच्या 9 हजार 621, 1 हजार फूटांपर्यंतच्या 2,936 तर 1 हजार चौरस फूटांच्यावर 1,439 मिळकती आहेत. त्यांना आता एकपट कर आकारणी लावून घेण्यासाठी आधी आपली थकबाकी भरावी लागणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
1 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)