तीच असते खरी देवपूजा

   कथाबोध

डॉ. न. म. जोशी

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शरश्‍चंद्र चतर्जी हे बंगालीतील ख्यातनाम लेखक होते. त्यांच्या कादंबऱ्या लोकांना खूप आवडत असत. कादंबरीत जे विचार ते मांडत असे ते त्यांनी स्वतःच आचरणात आणले होते. चतर्जी यांच्या घरी एक मोलकरीण कामाला होती. आणखी एक नोकरही बागकाम, पाणी भरणे यासाठी होता. तो नोकर आपलं काम झालं की देवपूजा करीत त्याला दिलेल्या खोलीत बसत असे. चतर्जी यांची वयस्कर बहीणही त्यांच्याच घरी राहात होती. चतर्जी यांची मोलकरीण अभेदा आजारी पडली. घरातली भांडीकुंडी तशीच पडली होती. वयस्कर बहीण पुढे आली. आणि स्वतः भांडी घासू लागली.
त्यांचा नोकर त्याच्या खोलीत देवपूजेला बसला होता. चतर्जी त्यावेळी नेहमीप्रमाणे काही लेखन करीत होते. बहीण भांडी घासत आहे हे पाहिल्यावर चतर्जी यांनी लेखणी खाली ठेवली आणि ते आपल्या वयस्कर बहिणीला भांडी घासण्यास मदत करू लागले. नोकरानं ही गोष्ट पाहिली आणि तो चटकन्‌ पुढं आला. स्वतः शरश्‍चंद्र भांडी घासत आहेत हे पाहिल्यावर नोकरानं आश्‍चर्यानं विचारलं, “स्वामी आपण हे काय करीत आहात?’

त्याला उत्तर देण्याऐवजी चतर्जी यांनी फक्त भांड्यांकडं खूण करीत उलट त्यालाच विचारलं…”मी काय करतोय हे तुला दिसतंय. पण तू काय करीत होतास?’ “मी तर देवपूजा करीत होतो स्वामी,’ नोकर म्हणाला. “मग मीही देवपूजाच करतो आहे. माझी वयस्कर बहीण हाच माझा देव आहे.’ हे उत्तर ऐकल्यावर नोकर वरमला आणि त्यानंही चतर्जी यांना दूर करून वयस्कर बहिणीला बाजूला होण्यास सांगून भांडी स्वच्छ करायला सुरुवात केली.
 

  कथाबोध

“कर्मे इशु भजावा’ असं संतानी सांगून ठेवलंय. केवळ जपजाप करणे देव्हाऱ्यातील देवांना आंघोळ घालत बसलो ही खरी देवपूजा नाही. काम आणि राम हे एकच आहे ईश्‍वराला सेवेची फुलं वाहिलेली आवडतात. साने गुरूजी यांनी घामाची फुलं या नावाची एक सुंदर गोष्ट लिहिली आहे. बागेत काम करून घाम गाळला, घामाचा वास कसाही असला, तरी श्रम करून बाग वाढवली तर बागेतील झाडांना फुलंही सुगंधीच येतात. चतर्जी यांनी आपल्या वर्तनातून हेच दाखवून दिलं की माणसानं कर्म करीत राहावे. काम आणि राम हे एकच आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)