तीघाही पोलीस कर्मचाऱ्यांची नियंत्रण कक्षात बदली

तीघाही पोलीस कर्मचाऱ्यांची नियंत्रण कक्षात बदली
पुणे,दि.8- दिघी पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षकासह चार पोलिस कर्मचाऱ्यांनी 50 हजारांची मागणी करत आळंदीतील वैभव पॅलेस या हॉटेलमधील चालक आणि कर्मचाऱ्याला जबर मारहाण केली. तसेच हा प्रकार शुक्रवारी रात्री 11 वाजण्याचा सुमारास घडला. याप्रकरणी तक्रार दिल्यास मारून टाकण्याची धमकी हॉटेल मालकाला देण्यात आली. गंभीर घटना असूनही पोलीस कर्मचारी असल्याने त्यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वास्तविकता याप्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल होणे आवश्‍यक होते. याप्रकरणी हॉटेल मालकाकाडे सीसीटीव्ही फुटेजही उपलब्ध आहेत. दरम्यान या प्रकरणाची पोलीस आयुक्तांनी गंभीर दखल घेऊन तीघाही कर्मचाऱ्यांची तातडीने पोलीस नियंत्रण कक्षात बदली केली आहे.
या प्रकरणी हॉटेल मालक अवधूत जालिंदर गाढवे, ( रा. स्पाईन रोड, सेक्‍टर ) यांची दिघी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तर लिंगराज रंगे गौडा रा. हडपसर,पुणे) विशाल शंकर गिरी (वय रा. आळंदी) यांना जबर मारहाण करण्यात आली. यासंदर्भात असे की, दिघी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक कदम, पोलीस कॉन्स्टेबल महेश खांडे, कोकणे, महिला पोलीस उपनिरीक्षक दशवंत आळंदी- पुणे रस्त्यावरील हॉटेल वैभव पॅलेसमध्ये गेले. तेथे थेट काऊंटरवरील लिंगराज गौडा यांना मारहाण करत 50 हजारांच्या खंडणीची मागणी मागणी केली. पैसे देण्यास नकार दिला दिल्यावर गौडा यांना आतील खोलीत नेऊन जबर मारहाण केली. यात त्यांच्या पोटावर आणि तोंडावर मोठी दुखापत झाली. यावेळी त्यांना सोडवायला गेलेल्या हॉटेलमधील कर्मचारी विशाल गिरी याला देखील लोखंडी पट्टीने मारहाण केली.
या मारहाणीनंतर लिंगराज गौडा यांच्या खिशातील पोलिस कॉन्स्टेबल महेश खांडे आणि कोकणे यांनी 19 हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. दरम्यान या प्रकाराची तक्रार दिघी पोलीस ठाण्यात देण्यास हॉटेलचे मालक अवधूत गाढवे गेले असता त्यांची तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ केली. तसेच तक्रार दिल्यास मारून टाकण्याची धमकी देण्यात आली. यानंतर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. अदखलपात्र गुन्हा दाखल करुन पोलीस कर्मचाऱ्यांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

यावेळी येथे हॉटेलमधील पार्सल देण्यासाठी आलेल्या गणेश बवले नावाच्या तरुणासही विनाकारण मारहाण करण्यात आली. त्याचे आळंदी परिसरात हॉटेल असून तो पार्सलची ऑर्डर देण्यासाठी येथे आला होता. यामुळे त्यानेही दिघी पोलीस ठाण्यात पोलिसांविरुध्द मारहाणीची तक्रार दाखल केली आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची 15 ऑगस्टला स्थापना झाली आहे. महिनाभरात येथील पोलिसांनी असा प्रताप केल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.
 दरम्यान दिघी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आरोपी व फिर्यादी यांना चाकण पोलीस ठाण्यात आयुक्तांसमोर चौकशीसाठी बोलावण्यात आले. मात्र त्यांना रात्री साडेसात पर्यंत सहायक पोलीस आयुक्तांनी भेट दिली नाही. यामुळे अन्याय होऊनही फिर्यादीना दिवसभर पोलीस ठाण्यात ताटकळत ठेवण्यात आल्याचा प्रकार घडला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)