तिहेरी तलाक विधेयकाला लवकरच कायद्याचे स्वरूप येईल – राष्ट्रपती

नवी दिल्ली : आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे अभिभाषण झाले. रामनाथ कोविंद यांचे हे पहिलेच अभिभाषण होते. त्यांनी त्यांच्या या भाषणातून सरकारच्या विविध कामांचा आढावा घेतला.

देशातील कमकुवत वर्गांसाठी सरकार कटिबद्ध असून देशातील सामाजिक न्याय तसेच आर्थिक लोकशाहीला सशक्त करणे आणि सामान्य नागरिकांचे जीवन सुलभ करण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे. सरकारने तिहेरी तलाक संबंधी एक विधेयक संसदेत सादर केले आहे. मला आशा आहे की, संसदेत लवकरच त्याला कायद्याचे रूप येईल. तिहेरी तलाकवर कायदा झाल्यानंतर मुस्लीम भगिनी आणि मुलींना आत्मसन्मानाने भयमुक्त जीवन जगता येईल, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीसमोरील अभिभाषणात केले. परंपरेनुसार राष्ट्रपती कोविंद यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीसमोर अभिभाषण केले.

-Ads-

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)