तिहेरी तलाक विधेयकामध्ये आता जामिनाचीही तरतूद

नवी दिल्ली – वादग्रस्त तिहेरी तलाक विधेयकामध्ये अंशतः सुधारणा करण्यास केंद्र सरकारने मंजूरी दिली. नव्या सुधारणेनुसार तात्काळ तोंडी तलाक देण्यात दोषी आढळलेल्या व्यक्‍तीला जामीन मंजूर करण्याची तरतूद समाविष्ट करण्यात आली आहे, असे सरकारी सूत्रांनी सांगितले. नवीन विधेयकानुसार तोंडी तलाक देणे बेकायदेशीर असून त्यासाठी तीन वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे.

मुस्लिम महिलांच्या वैवाहिक हक्कांचे रक्षण करण्याच्या या विधेयकाला लोकसभेची मंजूरी यापूर्वीच मिळाली आहे. मात्र राज्यसभेची मंजूरी मिळणे अद्याप बाकी आहे. राज्यसभेमध्ये सरकार अल्पमतात असल्यामुळे तेथे हे विधेयक मंजूर करणे सरकारसाठी अवघड आहे. तिहेरी तलाक विरोधी या विधेयकामध्ये जामीनाची तरतूद असावी, अशी विरोधकांची प्रमुख मागणी होती. मात्र जामीनाच्या तरतूदीचा समावेश करण्यात आल्यामुळे आता हे विधेयक राज्यसभेमध्येही मंजूर होण्याची शक्‍यता वाढली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)