तिहेरी तलाक अध्यादेश म्हणजे लोकशाहीची हत्या

अध्यादेश मागे घेण्याची मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाची मागणी

हैदराबाद – तोंडी आणि तिहेरी तलाक देण्याच्या कृतीला शिक्षापात्र गुन्हा ठरवण्याचा अध्यादेश हा लोकशाहीची हत्या करणारा असल्याची टीका “ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’ने केली आहे. या अध्यादेशाला कायदेशीर मार्गाने आव्हान देण्याची तयारी केली जात असल्याचेही बोर्डाने म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तिहेरी तलाकच्या मुद्दयावर सरकारला संसदेमध्ये चर्चा करण्याची गरज वाटली नाही हा देशाच्या सर्वोच्च कायदे मंडळाचा अवमान आहे, अशी टीकाही बोर्डाने केली आहे.

हा अध्यादेश म्हणजे “चोर दरवाजा’, लोकशाहीची हत्या आणि संसदेचा अवमान आहे. संसदेचे अधिवेशन सुरू होणे बाकी आहे. मात्र सरकारला त्यावर चर्चा करावीशी वाटली नाही. हा अध्यादेश मुस्लिम महिलांसाठी हानीकारक ठरण्याची शक्‍यताही बोर्डाचे सहायक सरचिटणीस मौलाना खालिद सैफ उल्लाह रेहमानी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मुस्लिम समाजाशी चर्चा न करता घेतलेल्या अध्यादेशाच्या निर्णयामुळे मुस्लिम समुदायावर अन्याय होईल, असेही ते म्हणाले.
मुस्लिम पर्सनल बोर्डाचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी “तिहेरी तलाक’वर बंदीचा अध्यादेश म्हणजे गैरव्यवहार असल्याचे म्हटले आहे. राफेल प्रकरण, नीरव मोदी, मेहुल चोक्‍सी आणि पेट्रोलच्या वाढत्या किंमतींवरून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचे भाजपचे तंत्र म्हणजे हा अध्यादेश आहे, असे ओवैसी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)