तिहेरी तलाक अध्यादेशाला आव्हान

अध्यादेशामुळे मुस्लिम पुरुषांच्या मूलभूत अधिकारांवर गदा : उच्च न्यायालयात याचिका

मुंबई – केंद्र सरकारच्या तिहेरी तलाक गुन्हा ठरविण्याच्या अध्यादेशाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. मुंबईतील माजी नगरसेवक मसूर अन्सारी आणि सामाजिक संस्था रायझिंग व्हॉईस फाऊंडेशन यांच्या वतीने अॅड. देवेंद्र मिश्रा यांनी दाखल केलेल्या या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

तिहेरी तलाक संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्या नंतर केद्र सरकारने त्यासंदर्भात अध्यादेश काढून तिहेरी तलाकाला बंदी घातली. केवळ मुस्लीम समाजाला टार्गेट ठेवून तिहेरी तलाक देणं गुन्हा ठरवण्याच्या तरतुदी करण्यात आली आहे, असा आरोप याचिकेत करून त्याला स्थगिती देण्याची विंनंती केली आहे. केंद्र सरकारने अध्यदेशाद्वारे तिहेरी तलाक देणाऱ्या व्यक्तीा दोषी ठरवून तीन वर्षाच्या शिक्षेची तरतूद केली आहे. तसेच पिडीत महिलेला आणि तिच्या अपत्यांना आर्थिक मदत मिळण्याची तरतूद केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)