तिसऱ्या मुलाच्या जन्मानंतर इटली सरकारकडून खास इनाम 

रोम (इटली): तिसऱ्या मुलाच्या जन्मानंतर इटली सरकार त्याच्या मातापित्याला खास इनाम देणार आहे. इटलीचे कृषी मंत्री जियान मार्को सॅंटिनियो यांनी ही घोषणा केली आहे. इटलीमध्ये मुलांचे प्रमाण फार कमी असल्याचे बोलले जाते, हे बदलले पाहिजे, असे सांगून सॅंटिनियो पुढे म्हणाले, की त्यासाठी मंत्रालय, विशेष करून ग्रामीण भागात मदत करायाल तयार आहे. तिसरे मूल झालेल्या कुटुंबाला सरकार जमिनीचा एके तुकडा 20 वर्षांसाठा कराराने देणार आहे. संपूर्ण युरोप खंडात इटलीत जन्मदर सर्वात कमी आहे.

मागील वर्षी इटलीमध्ये 4,64,000 बालकांची नोंद झाली आहे. इटलीत ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण अत्यधिक आहे. तिसरे अपत्य झालेल्या दांपत्यास 20 वर्षांसाठी जमीन कराराने देण्याच्या योजनेस कॅथलिक परिवाराचे मंत्री लॉरेंजो फॉंटना यांचा पाठिंबा आहे. तिसऱ्या मुलाच्या जन्मानंतर जमीन 20 वर्षांसाठी कराराने देण्याची ही योजना फक्त विवाहित जोडप्यांसाठीच लागू आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)