तिसरी पूना क्‍लब फुटबॉल लीग स्पर्धा: ड्युक्‍स ऑफ हजार्ड, आऊट ऑन बेल संघांची आगेकुच

पुणे: गेट मेस्सी, शुगर केन, ड्युक्‍स ऑफ हजार्ड, विझार्ड ऑफ ओझील, झाल्टन ऑफ स्विंग व आऊट ऑन बेल या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत पूना क्‍लब तर्फे आयोजित तिसऱ्या पूना क्‍लब फुटबॉल लीग स्पर्धेत विजयी आगेकुच नोंदवली.

पूना क्‍लब फुटबॉल मौदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात ब्रेंडोनने केलेल्या हॉट्रीकच्या जोरावर गेट मेस्सी संघाने सुआरेज बाईट्‌स संघाचा 7-1 असा एकतर्फी पराभव करत स्पर्धेतील मोठा विजय संपादन केला.
तर, दुसऱ्या सामन्यात निर्भय मिश्राच्या दोन गोलांच्या जोरावर ड्युक्‍स ऑफ हजार्ड संघाने ऍबसुलेटली फॅब्रिगेस संघाचा 3-1 असा सहज पराभव करत विजयी आगेकुच नोंदवली. तर, तिसऱ्या सामन्यात शुगर केन संघाच्या अर्णव लुल्ला, वैभव पवार व माहित थदाने यांनी केलेल्या गोलच्या बळावर कोक इन कॅन संघाचा 1-3 असा सहज पराभव करत स्पर्धेत विजयी आगेकूच नोंदवली.

-Ads-

सविस्तर निकाल –

साखळी फेरी
शुगर केन -3 (अर्णव लुल्ला 6मी, वैभव पवार 8मी, माहित थदाने 12मी) वि.वि कोक इन कॅन – 1 (विशाल कनस्तीया 10मी), गेट मेस्सी -7 (ब्रेंडोन 3, 6, 14मी, शरण पुरी 8, 15मी, देवेश अगरवाल 13, 10मी) वि.वि सुआरेज बाईट्‌स- 1(आदित्य गांधी 4मी), ड्युक्‍स ऑफ हजार्ड – 3 (निर्भय मिश्रा 5, 11मी, विनय मुत्याल 15मी) वि.वि ऍबसुलेटली फॅब्रिगेस- 1 (वेदांत मेहता 9मी), विझार्ड ऑफ ओझील – 3 (रजित परदेशी 7, 13मी, तुषार अस्वानी 10मी) वि.वि रोनाल्डो नट्‌स- 1 (कृष्णा जैन 12मी), झाल्टन ऑफ स्विंग – 3 (अखलाक पुनावाला 4, 9मी, खुष लुल्ला 13मी) वि.वि रॉनी ट्यून्स-1 (रोहित जाधव 6मी), आऊट ऑन बेल – 2 (अमित पोकर्णा 5मी, 14मी) वि.वि मार्क ओ पिर्लो- 0.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)