तिसरी पूना क्‍लब फुटबॉल लीग स्पर्धा: गेट मेस्सी संघाला विजेतेपद

पुणे: गेट मेस्सी संघाने अंतिम सामन्यात झाल्टन ऑफ स्विंग संघाचा पराभव करताना येथे सुरू असलेल्या पूना क्‍लब तर्फे आयोजित तिसऱ्या पूना क्‍लब फुटबॉल लीग स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

पूना क्‍लब फुटबॉल मौदानावर पार पडलेल्या या स्पर्धेत गेट मेस्सीच्या ब्रेंडोन डिसुझा व इशान मोतीवाले यांच्या प्रत्येकी एका गोलाच्या जोरावर झाल्टन ऑफ स्विंग संघाचा 2-1 असा पराभव करत विजेतेपद पटकावले आहे. यावेळी झाल्टन ऑफ स्विंगच्या गुनिश बेदीने एकमेव गोल झळकावला.

स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघांना करंडक पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण भारताचा फुटबॉलपटू रॉबीन सिंग,मेश को वर्कचे शार्दुल सिंग आणि कृष्णा सिंग, सुलभा पृथ्वी सिंग बायस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुना क्‍लबचे अध्यक्ष राहुल ढोले पाटील, उपाध्यक्ष नितिन देसाई, क्रीडा विभागाचे सचिव मनिष मेहता, क्रीडा समितीचे प्रमुख शशांक हळबे, सुनिल हंडा व स्पर्धा संचालक तारीक परवानी आदी मान्यवर उपस्थित होते.

सविस्तर निकाल –
अंतिम फेरी
गेट मेस्सी – 2 (ब्रेंडोन डिसुझा 7मी, इशान मोतीवाले 12मी) वि.वि झाल्टन ऑफ स्विंग – 1 (गुनिश बेदी 9मी).
इतर पारितोषिके
गोल्डन बुट- ब्रेंडोन डिसुझा, सर्वोत्कृष्ट खेळाडू- अखलाक पुनावाला, सर्वोत्कृष्ट डिफेंडर- गुनिश बेदी, सर्वोत्कृष्ट मध्यरक्षक- रजित परदेशी.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)