तिसरी एसएनबीपी अखिल भारतीय हॉकी स्पर्धा: ‘हे’ संघ उपान्त्यपूर्व फेरीत

पुणे: पुण्याच्या क्रीडा प्रबोधिनी व एसएनबीपी ऍकॅडमी यांच्यासह मध्यप्रदेश हॉकी असोसिएशन आणि हरयाणाच्या जय भारत हॉकी या संघांनी चमकदार विजयाची नोंद करताना आपापल्या गटातून तिसऱ्या एसएनबीपी अखिल भारतीय हॉकी स्पर्धेच्या उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

श्री शिवछत्रपती क्रीडानगरी, म्हाळुंगे-बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेतील ड गटाच्या सामन्यात क्रीडा प्रबोधिनी संघाने हॉकी कुर्ग संघाचा 11-0 असा धुव्वा उडविला. विजयी संघाकडून अक्षय शेंडे याने 4 गोल, आदित्य लालगे व धैर्यशील जाधव यांनी प्रत्येकी दोन गोल, तर अशोक उरगुडे, मुस्ताफा शेख व प्रथमेश हजारे यांनी प्रत्येकी एकेक गोल करून संघाला सहज विजय मिळवून दिला.

अ गटातील सामन्यात आयोजक एसएनबीपी ऍकॅडमी संघाने हॉकी धुलिया संघाचा 13-0 असा एकतर्फी पराभव करून उपान्त्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्‍चित केले. यामध्ये एसएनबीपीच्या शादाब मोहम्मद याने सलग 3 गोल केले. याशिवाय नरेश चाटोळे याने तीन, अभिषेक माने याने दोन तर, प्रतीक सोळंकी, नागेश वाघमारे, अजय गोटे, ऋषिकेश मांडाळे व अभिषेक खालगे यांनी प्रत्येकी एकेक गोल केले.

क गटातील सामन्यात जय भारत हॉकी, भिवानी, हरयाणा संघाने मुंबई स्कूल स्पोर्टस्‌ असोसिएशन संघाचा 5-1 असा सहज पराभव करून आगेकूच केली. ब गटाच्या सामन्यात मध्यप्रदेश हॉकी असोसिएशन गुमान हेरा राईझर्स संघाचा 3-1 असा सहज पराभव करून उपान्त्यपूर्व फेरी गाठली. अब्दुल अहाड, प्रियो बात्रा व शैलेंद्र सिंग यांनी चमकदार कामगिरी करून संघाला सहज विजय मिळवून दिला.

सविस्तर निकाल –
गट क – जय भारत हॉकी, भिवानी, हरयाणा – 5 (अग्यापाल 31 व 64वे मि., हरीष ज्युनिअर 34वे मि., भरत कौशिक 62वे मि., गोविंद 68वे मि.) वि.वि. मुंबई स्कूल स्पोर्टस्‌ असोसिएशन – 1 (हृतिक गुप्ता 14वे मि.); मध्यंतर- 2-1;
गट ड – क्रीडा प्रबोधिनी – 11 (अक्षय शेंडे 2, 14, 30 व 38वे मि., आदित्य लालगे 6 व 18वे मि., अशोक उरगुडे 7वे मि., मुस्ताफा शेख 17वे मि., धैर्यशील जाधव 23 व 34वे मि., प्रथमेश हजारे 25वे मि.) वि.वि. हॉकी कुर्ग – 0; मध्यंतर- 10-0;
गट अ – एसएनबीपी ऍकॅडमी – 13 (शादाब मोहम्मद 1, 2 व तिसरे मि., नरेश चाटोळे 7, 14 व 45वे मि., प्रतीक सोळंकी 10वे मि., नागेश वाघमारे 22वे मि., अजय गोटे 26 मि., अभिषेक माने 28 व 55वे मि., ऋषीकेश मांडाळे 41वे मि., अभिषेक खालगे 49वे मि.) वि.वि. हॉकी धुलिया – 0; मध्यंतर- 9-0;
गट बः मध्यप्रदेश हॉकी असोसिएशन – 3 (अब्दुल अहाड 31वे मि., प्रियो बात्रा 52वे मि., शैलेंद्र सिंग 63वे मि.) वि.वि. गुमान हेरा रायझर्स – 1 (साहिल कुमार 19वे मि.); मध्यंतर- 1-1;
गट ब – मध्यप्रदेश हॉकी ऍकॅडमी, भोपाळ – 9 (प्रियो बात्रा 7 व 13वे मि., सादम अहमद 17वे मि., शैलेंद्र सिंग 40 व 65वे मि., अलि अहमद 43वे मि., मुदासार कुरेशी 48 व 50वे मि., डिंकु शर्मा 69वे मि.) वि.वि. कोहिनूर ऍकॅडमी – 0; मध्यंतर- 3-0.
गट ई – स्पोर्टस्‌ ऍथॉरिटी ऑफ गुजरात – 1 (गौरांग अंबूलकर 70वे मि.) वि.वि. हॉकी शिंदेवाही – 0; हाफ टाईमः 0:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)