तिसरा कसोटी क्रिकेट सामना: कोहली-रहाणे भागीदारीने भारताची कडवी झुंज 

नॉटिंगहॅम: विराट कोहलीने कर्णधाराला साजेशी खेळी करताना झळकावलेले झुंजार अर्धशतक आणि उपर्कधार अजिंक्‍य रहाणेच्या साथीत त्याने केलेल्या अखंडित शतकी भागीदारीमुळे येथे सुरू झालेल्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताने  4 बाद 254 धावांची मजल मारली.

विराट कोहली 129 चेंडूंत 10 चौकारांसह नाबाद 84 धावांवर खेळत आहे. तर रहाणे 131 चेंडूंत 12 चौकारांसह 81 धावांवर बाद झाला.  उपाहाराच्या ठोक्‍याला पुजारा बाद झाल्यामुळे भारताची 3 बाद 82 अशी घसरगुंडी झाली होती. परंतु कोहली व रहाणे यांनी दुसऱ्या सत्रात एकही बळी न जाऊ देता 29.2 षटकांत 107 धावांची अखंडित भागीदारी करीत भारताचा डाव सावरला.

-Ads-

स्वच्छ सूर्यप्रकाशात सुरू झालेल्या या सामन्यातील उपाहारापर्यंतचे पहिले सत्र सनसनाटी ठरले. शिखर धवन आणि लोकेश राहुल या मालिकेतील तिसऱ्या भारतीय सलामी जोडीने भारताला 18.4 षटकांत 60 धावांची सलामी दिली. मात्र त्यानंतर उपाहारापर्यंतच्या 8 षटकांत सलामीवीरांसह चेतेश्‍वर पुजाराचाही बळी गमावून भारताने त्यांच्या कामगिरीवर बोळा फिरविला. शिखर धवनने 65 चेंडूंत 7 चौकारांसह 35 धावा केल्या, तर लोकेश राहुलने 53 चेंडूंत 4 चौकारांसह 23 धावा केल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)