तिसरा एकदिवसीय सामना: होपचे शतक हुकले, भारतासमोर २८४ धावांचे लक्ष्य 

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्या सुरु असलेया  एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने भारतासमोर २८४ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. यामध्ये मधल्या फळीतील फलंदाज शे होप यांच्या झुंझार ९५ धावांखेळी केली. तर  शेवटच्या काही षटकात  ए. नर्स यानेदेखील २२ चेंडूत वेगवान ४० धावा केल्या.

दरम्यान, भारताने प्रथम नेणेफेकीचा कौल जिंकला आणि गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय कर्णधार विराट  कोहलीचा हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी सार्थ ठरविला. २५ धावांवर  विंडीजला पहिला झटका बसला. सलामीवीर सी. हेमराज हा बाद झाला त्यानंतर दुसरा सलामीवीर पॉवेल देखील बाद झाला ८ षटकात ४१ धावांच्या मोबदल्यात त्यांचे दोन्ही सलामीवीर माघारी परतले. त्यानंतर खलील अहमदने मार्लीन सॅम्युअल्सला बाद करत भारताला तिसरे यश मिळवून दिले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ठराविक अंतराने विंडीजने फलंदाज बाद होत होते तरी मागील सामन्यात हिरो ठरलेला होप या सामन्यात देखील चांगली फलंदाजी करत होता.  त्याने एक बाजू सांभाळत ११३ चेंडूत ९५ धांवांची झुंझार खेळी केली. त्याला जसप्रीत बुमराहने त्रिफळाचीत बाद केले.  शेवटी ए. नर्स याने देखील वेगवान  ४० धावा करत संघाची धावसंख्या २७०च्या पुढे नेली आणि शेवटी ५० षटकापर्यंत विंडीजने ९ बाद २८३ धावांपर्यंत मजल मारली.

 

भारतासाठी जसप्रीत बुमराह याने ४ बळी घेतले तर चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने २ गडी बाद केले. खलील अहमद, भुवनेश्वर कुमार आणि युझवेन्द्र चहल यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)