पुणे – राज्यात पावसाने उघडीप दिल्याने तापमानात चढ-उतार होत आहेत. दोन दिवसांपूर्वी तिशीपार गेलेले तापमान पुन्हा खाली घसरले आहे. दिवसाबरोबरच रात्रीच्या तापमानातही घट झाल्याने अनेक ठिकाणी गारठा जाणवू लागला आहे. पुढील आठवडाभर राज्यात पावसाची उघडीप राहण्याची शक्‍यता असून, तुरळक ठिकाणी हलक्‍या पावसाचा अंदाज आहे.

राज्याच्या बहुतांश भागात रविवारी (दि.9) तापमानाचा पारा सरासरीच्या खाली उतरला आहे. विदर्भात असलेल्या ढगाळ वातावरण आणि पावसामुळे दिवसाच्या तापमानात 3 ते 5 अंशांची घट झाली आहे. तर, विदर्भासह मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही दिवस रात्रीचे तापमान कमी झाले आहे. बीड येथे दिवसाचे उच्चांकी 31.8 अंश सेल्सिअस, उस्मानाबाद येथे रात्रीचे निचांकी 13.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मध्य प्रदेशच्या वायव्य भागात असलेल्या ठळक कमी दाब क्षेत्राची तीव्रता कमी होत आहे. यातच मॉन्सूनचे प्रवाह कमजोर झाल्याने राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. शनिवारी सकाळपर्यंत विदर्भात अनेक ठिकाणी तर कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस झाला. उर्वरित राज्यात कोरडे व अंशत: ढगाळ हवामान होते. आठवडाभर हिच स्थिती कायम असून, पावसाची उघडीप कायम राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)