तिळवणीत ग्राम स्वराज योजनेचा शुभारंभ; दलितवस्तीत 14 मोफत वीजजोडण्या

कोल्हापूर – केंद्र सरकारच्या निर्देशानुसार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून 80 टक्के पेक्षा जास्त दलितवस्ती असलेल्या गावात ‘ग्राम स्वराज अभियान’ राबविले जात आहे. त्यासाठी राज्यातील 192 गावे निवडण्यात आली असून यात हातकणंगले तालुक्यातील तिळवणीचा समावेश झाला आहे. यानिमित्ताने तिळवणीत महावितरणतर्फे आज (दि.14) दिवसभरात 14 लाभार्थ्यांना मोफत वीजजोडण्या देण्यात आल्या असून, दोन दिवसांत दलितवस्तीचे 100 टक्के ऊर्जीकरण करण्यात येणार आहे.

तिळवणीची लोकसंख्या 3 हजार 605 तर घरांची संख्या 814 आहे. 791 घरांमध्ये वीज केंव्हाच पोहोचली होती. केवळ 23 घरे विजेविना होती. त्यातील 6 कुटुंबे सध्या वास्तव्यास नाहीत. त्यामुळे शिल्लक 17 कुटुंब त्यासाठी  पात्र ठरली. या 17 पैकी 14 कुटुंबांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी प्रकाशमान करण्यात आले. शिल्लक 3 कुंटुंबांना दोन पोल टाकून येत्या दोन दिवसांत वीज कनेक्शन दिले जाणार आहे या अभियान अंतर्गत शासनाच्या विविध योजना राबविल्या जात आहेत. ऊर्जा विभागाकडून प्रधानमंत्री सहज बिजली   हर घर योजना अर्थात सौभाग्य व उजाला योजना राबविण्यात येत आहेत . उजाला योजनेतून तिळवणीकरांना 50 रुपयांत 9 वॅटचा एलईडी बल्ब तीन वर्षांच्या गॅरंटीसह मिळणार आहे.

यावेळी महावितरण कोल्हापूर परिमंडलाचे मुख्य अभियंता किशोर परदेशी, प्रभारी अधीक्षक अभियंता  सागर मारुलकर, कार्यकारी अभियंता  मकरंद आवळेकर, उपकार्यकारी अभियंता  बी.टी. मोहिते, शाखा अभियंता  अमर करंडे यांनी तिळवणी येथे जाऊन पहिल्याच दिवशी 14 मोफत वीजजोडण्या देण्याचे काम केले आहे. यावेळील सरपंच  शकुतला रामचंद्र चव्हाण, उपसरपंच  सविता दादासो कदम, ग्रामसेवक राहूल माळगे व ग्रामस्थांची  उपस्थिती होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)