तिळगूळ घ्या, गोड गोड बोला आणि मोदींना बाजूला करा- राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे भिवंडीमध्ये भाजप सरकारवर शरसंधान

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसने परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून कोकण पिंजून काढला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने भाजप विरोधात हत्यात उपसले असून भाजपवर टीकांचा भडीमार केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

देशातील जनतेचा मोठा भ्रमनिरास झाला आहे. या सरकारमध्ये जे सांगितले ते देण्याची धमक नाही, क्षमता नाही. हे सरकार पूर्णपणे खोटं बोलत आहे, याचे जनतेने थोडे चिंतन करायला हवे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष  जयंत पाटील यांनी केले. लोकांना आजही १५ लाख खात्यात येतील ही अपेक्षा आहे. १५ लाख नाही पण किमान पन्नास-साठ हजार तरी खात्यात येतील अशी अपेक्षा लोकांची होती, पण भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनी स्वतः स्पष्ट केलं की १५ लाख हा जुमला होता, त्यामुळे भाजपाचा खोटेपणा उघड झाल्याची टीका जयंत पाटील यांनी केली आहे.

यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री गणेश नाईक, आमदार पांडुरंग बरोरा, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष जयदेव गायकवाड, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे,भिवंडी जिल्हाध्यक्ष दशरथ तिवरे आदींसह भिवंडी येथील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)