तिला साथ देणाऱ्या ‘त्यां’चेही आभार

खरे तर तिचे आयुष्य त्याच्या साथीने चालूच असते. हा प्रत्येक ‘तो’ तिच्या आयुष्यात प्रथम वडील, मग भाऊ, नंतर नवरा, सासरा, दीर आणि मग मुलगा अशा जवळच्या नात्याने येतो. आणि काका, मामा, चुलत आणि मावस भावंडे अशा काहीशा दूरच्या नात्याने येतो. याशिवाय मित्र, करिअर मधील सहकारी अशा व्यावसायिक नात्यांसह अनेक विविध रूपांमध्ये येतच असतो. आजकालचा हा कौटुंबिक ‘तो’ तिच्यासाठी तसार्‌ िीींेर्ळींश च राहिला आहे. वडिलांनी दिलेले मतस्वातंत्र्य असो की नवऱ्याने दिलेले प्रोत्साहन असो, तो तिच्या घडण्याच्या प्रक्रियेमध्ये सहज गुंतून जातो.

डॉ. सुरेखा कोठेकर

वेगवेगळ्या नात्यांना टिकवताना कमालीचे कौशल्य दाखवताना आजची आधुनिक स्त्री पदोपदी आपल्याला भेटते. वडिलांनी दिलेले स्वातंत्र्य, नवऱ्याने दिलेले प्रोत्साहन आणि सहकार्य यांमुळे अनेक स्त्रियांनी इतिहास घडवला आहे. इंदिराजींना नेहरूंनी दिलेले स्वातंत्र्य व त्याचे चीज करीत इंदिराजींनी सिद्ध केलेले स्वत:चे कर्तृत्व, नवऱ्याने प्रोत्साहन दिल्याने, झालेल्या पहिल्या महिला डॉक्‍टर आनंदीबाई जोशी, समाजसुधारक सावित्रीबाई फुले अशी अगणित उदाहरणे आपल्याला सांगता येतील.

कधीकधी एखादा ‘तो’ तिच्या करिअरसाठी घराची पूर्ण जबाबदारी घेतो तर कधीतरी ‘तो’ तिने दिलेल्या आधाराचे जाहीर कौतुक करतानाही दिसतो. म्हणूनच बॉक्‍सिंगसारख्या वेगळ्या क्षेत्रात यश कमावणाऱ्या मेरी कोमचे जेवढे कौतुक वाटते तेवढेच तिच्या मुलांना जबाबदारीने सांभाळणाऱ्या आणि तिला प्रोत्साहन देणाऱ्या नवऱ्याचेही वाटते. तिच्या कष्टांची जाणीव, हुशारीचे कौतुक जेव्हा पुरुषी अहंकार न ठेवता ‘ तो’ करतो तेव्हा आठवतात पूर्वपिढीतील अनेक स्त्रिया, ज्या क्षमता असूनही केवळ न मिळालेल्या पाठिंब्यामुळे घरातच राहिल्या. स्त्रीशिक्षणाची सुरुवात सावित्रीबाई फुलेंनी केली. पण त्यांच्याही पाठीमागे महात्मा ज्योतीराव फुले यांच्यासारखा तळमळ असलेला ‘तो’च होता आणि आजच्या काळातही सॅनिटरी पॅडसारख्या नाजूक समस्येवर कष्ट करणाराही मुरूगनाथन ‘तो’च आहे. अबला असणाऱ्या स्त्रियांना सबला करण्यासाठी, तिला तिचे हक्क आणि अधिकार मिळावेत यासाठी तिच्याबरोबरच अनेक ‘तो’ही झटले आहेत. स्त्रियांवर अत्याचार करणारेही ‘तो’च असतात आणि न्याय मिळवून देणारा एखादाही ‘तो’ च असतो. एकेकाळी फक्त स्त्रियांच्या असलेल्या स्वयंपाक क्षेत्राला प्रतिष्ठा मिळवून देण्यात त्याचाही वाटा आहे आणि म्हणूनच गुलाबजाम सारखा चित्रपट सर्वाना आवडून जातो.

स्त्रियांची हुशारी, आत्मविश्वास, मेहनतीची तयारी, यामुळे त्या प्रत्येक क्षेत्रात कर्तृत्व गाजवतच आहेत आणि अशा अनेक ‘ती च्या मागे जसे आई, सासू किंवा बहीण आहे तसेच नवरा, मुले आणि सहकारीही आहेतच मुलींना जन्मच नाकारणाऱ्या, स्त्रियांना कमी लेखणाऱ्या, त्यांचे खच्चीकरण करणाऱ्या, त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या अनेक ‘तो’ च्या वृत्तींना विरोध तर करायचाच आहे, पण त्या नादात या स्त्रीशक्तीला पाठबळ देणाऱ्या ‘तो लाही विसरून चालणार नाही . म्हणूनच या गृहकृत्यदक्ष गृहिणी ते अंतरिक्षात यान किंवा लढाऊ विमान चालवण्यापर्यंतचे हरएक क्षेत्र जबाबदारीने सांभाळणाऱ्या ‘ती’च्या हुशारीला आणि मेहनतीला सलाम आणि तेवढ्याच खंबीरपणे ‘ती’च्या पाठीमागे कुठल्या ना कुठल्या नात्याच्या वा मैत्रीच्या रूपात त्यांना साथ देणाऱ्या अनेक ‘तो’ नाही मनोमन धन्यवाद!!!

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)