तिलारी प्रकल्पातील पाण्याच्या उपयोगासाठी सूक्ष्म सिंचन वापर आराखडा तयार करण्याचे निर्देश

मुंबई: तिलारी प्रकल्पाच्या पाच हजार ६०० हेक्टर क्षेत्रातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचन पद्धतीने पाणी मिळावे, यासाठी कृषी व सिंचन विभागाने योजना आखून तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश गृह राज्यमंत्री (ग्रामीण) तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज सांगितले.

श्री. केसरकर म्हणाले, उजवा तीर, डावा तीर, बांधा हे प्रांत प्रकल्पाअंतर्गत येत असून, संबंधित क्षेत्रातील सर्व गावांना या योजनेचा फायदा होईल या पद्धतीने काम करावे. उपलब्ध निधीचा योग्य वापर करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी नियोजना करावे. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय झाल्यास उत्पन्न दुप्पट होईल.

-Ads-

सूक्ष्म सिंचन सर्व शेतकऱ्यांना मोफत असून, यामध्ये सौरऊर्जा पंपाचा उपयोग केल्यास जास्तीत जास्त फायदा होऊ शकेल. त्यासंदर्भातील अहवाल तयार करून तातडीने कार्यवाही करावी, असेही केसरकर यांनी सांगितले.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)