तिरुवनंतपुरम्‌मध्ये चक्रीवादळाचा इशारा देणारे केंद्र महिनाभरात उभारणार

नवी दिल्ली – गेल्या काही दिवसात केरळ आणि कर्नाटक किनारपट्टीवर चक्रीवादळे आणि प्रतिकूल हवामानाचा तडाखा बसत असल्याच्या अनेक घटनांच्या पार्श्वभूमीवर चक्रीवादळाचा इशारा देणारे केंद्र तिरुवनंतपूरम्‌मध्ये उभारण्याचा केंद्रीय भू-विज्ञान मंत्रालयाचा प्रस्ताव आहे. एका महिन्यात हे केंद्र उभारण्याचा मंत्रालयाचा विचार आहे. चक्रीवादळाचा इशारा देणारी केंद्रं सध्या चेन्नई, विशाखापट्टणम्‌, भुवनेश्वर, कोलकाता, अहमदाबाद आणि मुंबईत आहे.

तिरुवनंतपूरमधले केंद्र हवामानाचा इशारा आणि मच्छिमारांसाठी किनारपट्टी बुलेटिन काढण्यासाठी हवामानविषयक सर्व साधनांसह सर्व पायाभूत सोयींनी युक्त असेल.

-Ads-

2019 पर्यंत मंगलोर येथे आणखी एक सी बॅण्ड डॉप्लर वेदर रडार स्थापन करण्याचाही मंत्रालयाचा विचार आहे. कोची आणि तिरुवनंतपुरम्‌ येथे अशी रडार कार्यरत आहेत. पुढच्या महिन्यापर्यंत सर्व राज्यांच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि संबंधिताची जागृती आणि प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्याचाही मंत्रालयाचा विचार आहे. प्रभावी निर्णयासाठी नव्या उपकरणांचा कसा वापर करावा याबाबत माहिती आणि प्रशिक्षणही या कार्यशाळेत देण्यात येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)