तिरमली समाजाची जातपंचायत कायमस्वरूपी रद्द

पोलीस निरीक्षक पोवार यांचा पुढाकार झाला निर्णय
प्रभात वृत्तसेवा
श्रीगोंदा – तालुक्‍यातील काष्टी येथे अहमदनगर, बीड आणि औरंगाबाद जिल्ह्यातील तिरमली समाजातील लोक आणि जातपंचायतीचे पंच यांची बैठक घेऊन संपूर्ण राज्यात तिरमली समाजाची जातपंचायत कायमस्वरूपी रद्द करण्याचा मोठा निर्णय झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी दिली.
पोलीस निरीक्षक पोवार यांनी म्हटले आहे की, पोलीस प्रशासन आणि जिल्हा परिषद सदस्य सदाशिव पाचपुते यांनी तिरमली समाजतील लोक आणि तिरमली समाजाच्या जातपंचायतीचे पंच यांची काष्टी येथे गुरुवारी (दि.27) दुपारी बैठक आयोजित केली होती. या बैठकीला नगर जिल्ह्यासह बीड आणि औरंगाबाद जिल्ह्यातील तिरमली समाजाचे लोक आणि पंच उपस्थित होते. चार जिल्ह्यातील तिरमली समाजाचे लोक आणि जातपंचायतीचे पंच यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील जातपंचायत कायमची रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याचे पोवार यांनी सांगितले.
तिरमली समाजाचे मतपरिवर्तन करण्यासाठी पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अतिरिक्‍त पोलीस अधीक्षक जयंतकुमार मीना, विभागीय पोलीस अधीक्षक सुदर्शन मुंडे यांचे मोठे सहकार्य झाल्याचे सांगत तिरमली समाजाची जातपंचायत कायमस्वरूपी रद्द होणे हे पोलीस प्रशासनाचे मोठे यश आल्याचे पोवार म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)