तिरंग्याची पायपुसणी विक्री करणाऱ्या ऍमेझॉनवर कारवाईचा केंद्राचा इशारा

मुंबई : परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी अमेझॉन या संकेतस्थळावर कारवाईचे संकेत दिले आहेत. अमेझॉनच्या कॅनडातील संकेतस्थळावर तिरंग्यासारखी पायपुसणी विक्रीला ठेवण्यात आली आहेत. त्याविरोधात स्वराज यांनी ट्‌विटरवरुन निशाणा साधला आहे. तसेच कॅनडातील भारतीय दुतावासाला ऍमेझॉनवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
नेहमीच आपल्या ट्‌विटर अकाऊंटवरुन लोकांच्या समस्या सोडवणाऱ्या सुषमा स्वराज यांना ट्‌विट करुन तिरंग्यासारख्या पायपुसण्याची माहिती एका व्यक्तीने दिली होती. त्याची लगेच दखल घेत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी अमेझॉनवर कारवाईचे संकेत दिले आहेत. ऍमेझॉनने तिंरंग्यासारख्या पायपुसण्याची विक्री लगेच थांबवावी. तसेच भारताच्या तिरंग्याच्या अवमानाप्रकरणी माफी मागावी असे आपल्या ट्‌विटमध्ये म्हटलं आहे. तसेच अमेझॉनच्या कोणत्याही कर्मचाऱ्याला व्हिजा देणार नसल्याचे सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केले आहे. सध्या ज्या अमेझॉनच्या कर्मचाऱ्यांकडे भारताचा व्हिजा आहे. त्यांचा व्हिजा रद्द करणार असल्याचे स्वराज यांनी सांगितले आहे. अमेझॉनच्या संकेतस्थळावर भारताच्या तिरंग्यासारख्या पायपुसणीसोबतच इंग्लंडच्या झेंड्याच्या रंगाचीही पायपुसणी विक्रीस ठेवण्यात आली आहे. सोशल मीडियावरुन या वेबसाईटच्या पेजचे स्क्रीनशॉट काढून व्हायरल केले जात आहेत. सोशल मीडियावर याप्रकरणी तिरंग्याचे स्क्रीनशॉट्‌स व्हायरल होत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)