तिरंगी टी-20 क्रिकेट मालिकाः भारताचे इंग्लंडसमोर 199 धावांचे आव्हान

मुंबई – तिरंगी टी-20 क्रिकेट स्पर्धेत आज भारत विरुद्ध इंग्लंड असा सामना सुरू आहे. भारताने प्रथम फलंदाजी करुन इंग्लंड समोर 199 धावांचे आव्हान ठेवले आहे. भारतीय संघाने खेळाची सुरुवात चांगली केली. सलामी जोडी स्मृती मंधाना आणि मिताली राजने सुरुवातीची ओवर सावधपणे खेळून नंतर धडाकेबाजी सुरू केली. मंधाने 76 तर मिताली राजने 53 धावा केल्या आहेत. आता भारताच्या गोलंदाजांची कसोटी लागणार आहे. प्रथम गोलंदाजीला सरुवात अनुभवी झुलन गोस्वामीने केली आहे.

इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. यामुळे भारताला खेळाची सुरुवात चांगली करावी लागणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सलामीच्या लढतील पराभूत झालेला भारतीय महिला संघ इंग्लंडविरुद्ध विजय मिळवण्याच्या निर्धाराने मैदानात उतरला आहे. भारताने विजय मिळवल्यास अंतिम फेरीतील स्थान मिळवण्याच्या त्यांच्या आशा टिकून राहणार आहेत.

आयसीसी चॅम्पियनशीपच्या ऑस्ट्रेलियाविरोधातील मालिकेत भारताला 3-0 असा पराभव स्वीकारावा लागला. यानंतर तिरंगी मालिकेतील पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर विजय मिळवला. यामुळे या सामन्यात विजय मिळवणे भारतासाठी मोठे आव्हान आहे. सलामी चांगली होऊनही मधल्या फळीतील फलंदाजांकडून चांगली खेळी होत नाही. याचाच फटका भारतीय महिला संघाला बसतो आहे. गोलंदाजीत अनुभवी झुलन गोस्वामीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रतिस्पर्धी फलंदाजांवर दबाव आणला. मात्र तिला शिखा पांडे आणि रुमेली धर यांची साथ मिळाली नाही. तर दुसरीकडे स्पर्धेमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध आठ विकेट राखून विजय मिळवल्याने इंग्लंडच्या संघातील महिलांचा आत्मविश्वास उंचावला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)