तिरंगी टी-20 क्रिकेट मालिका; इंग्लंड महिला संघाचा ऑस्ट्रेलियावर एकतर्फी विजय

सामनावीर नताली स्किव्हरची चमकदार कामगिरी

मुंबई – भारतीय महिला संघावर सहज विजय संपादन करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाला आठ गडी आणि 18 चेंडू राखून पराभूत करताना इंग्लंड महिला संघाने येथे सुरू असलेल्या तिरंगी टी-20 क्रिकेट मालिकेत विजयी सलामी दिली. नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा इंग्लंड महिला संघाचा निर्णय योग्य असल्याचे दाखवून देताना त्यांच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियन महिला संघाला निर्धारित 20 षटकांत 8 बाद 149 धावांत रोखले. त्यानंतर इंग्लंड महिला संघाने केवळ 17 षटकांत 2 बाद 150 धावा फटकावून एकतर्फी विजयाची नोंद केली.

विजयासाठी 150 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंड महिला संघाला डेलिसा किमिन्से आणि मेगॅन शुट यांनी सुरुवातीलाच दोन झटके दिले, त्यांनी ब्रिओनी स्मिथ (1) आणि डॅनियली व्याट (18) यांना लवकर बाद करताना इंग्लंडची 2 बाद 34 अशी अवस्था केली होती. परंतु टॅमी ब्यूमॉंट आणि नताली स्किव्हर यांनी 12.1 षटकात नाबाद 116 धावांची अखंडित भागीदारी करताना इंग्लंडचा विजय साकार केला. इंग्लंडची यष्टीरक्षक फलंदाज टॅमी ब्यूमॉंटने 44 चेंडूंत आठ चौकारांच्या मदतीने नाबाद 58 धावा, तर नताली स्किव्हरने 43 चेंडूंत 10 चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने नाबाद 68 धावा फटकावल्या.

तत्पूर्वी पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियन महिला संघाला सुरुवातीपासूनच ठराविक अंतराने झटके बसले. त्यामुळे त्यांना एकही मोठी भागीदारी करता आली नाही. सलामीवीर ऍलिसा हीलीने उपयुक्‍त खेळी करताना 23 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 31 धावा फटकावल्या. ऍलिसा बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन महिला संघाला एकही मोठी भागीदारी रचता आली नाही.

कर्णधार रॅचेल हेन्सने एक बाजू लढवताना 45 चेंडूंत आठ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 65 धावा केल्या. तिला ऍश्‍ले गार्डनरने 16 चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारसांह 28 धावांची खेळी करत सुरेख साथ दिली. परंतु ऑस्ट्रेलियाच्या बाकी फलंदाज सपशेल अपयशी ठरल्यामुळे त्यांचा डाव 8 बाद 149 धावांवर रोखला गेला. इंग्लंडकडून जेनी गनने 26 धावा देत तीन बळी मिळवले. तर नतालीने 29 धावांत 2 गडी बाद करताना तिला सुरेख साथ दिली.
संक्षिप्त धावफलक – ऑस्ट्रेलियन महिला संघ – 20 षटकांत आठ बाद 149 (ऍलिसा हीली 31, ऍश्‍ले गार्डनर 28, रॅचेल हेन्स 65, जेनी गन 26-3, नताली स्किव्हर 29-2) पराभूत विरुद्ध इंग्लंड महिला संघ 17 षटकांत 2 बाद 150 (टॅमी ब्यूमॉंट 58, नताली स्किव्हर 68, डेलिसा किमींस 12-1)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)