तिरंगी टी-20 क्रिकेट मालिका; ऑस्ट्रेलियन महिलांचा दणदणीत विजय

मुंबई  – जोरदार प्रारंभानंतर सूर गमावलेल्या इंग्लंड महिला संघावर अंतीम सामन्यात ऑस्ट्रेलियन महिला संघाने दणदणित विजय मिळवत तिरंगी टी-20 क्रिकेट मालिका आपल्या नावे केली. सामन्यात ऑस्ट्रेलियानं विजयासाठी दिलेलं 210 धावांचं आव्हान इंग्लंड संघाला पेलवलं नाही. 20 षटकांत त्यांना 152 धावांपर्यंतच मजल मारता आली आणि ऑस्ट्रेलियानं 57 धावांनी दणदणीत विजय मिळवला.

210 धावांचे आव्हाण घेऊन उतरलेल्या इंग्लंडसंघाचे सुरुवात खराब झाली. त्यांची सलामीवीर ब्रिओनी स्मिथ दुसऱ्याच चेंडूवर धावबाद झाली तर स्पर्धेत सातत्याने चांगली कामगीरी करणारी टॅमी ब्युमोंट देखील पहिल्याच चेंडूवर बाद झाल्याने इंग्लंड महिला संघाची 2 बाद 14 अशी अवस्था झाली. परंतु एका बाजुने लढा देताना डॅनिएली व्याटने 17 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने 34 धावा फटकावल्या. व्याट जो पर्यंत फलंदाजी करत होती तो पर्यंत सामन्यात काहीही होऊ शकते अशी परिस्थीती निर्माण झाली होती. व्याटला किमंसने बाद करत इंग्लंडच्या धावगतीला ब्रेक लावला.

व्याट बाद झाल्या नंतर नताली स्किवर आणि ऍमी जोन्स यांनी धावफलक हालता ठेवत सात षटकात 51 धावांची भागीदारी केली. त्या नंतर धावांची गती वाढवन्याच्या प्रयत्नात दोघीही ठरावीक अंतराने बाद झाल्या. त्या मुळे इंग्लंडचा संघ निर्धारीत 20 षटकात केवळ 152 धावाच करु शकला. इंग्लंड कडून नताली स्किवरने 42 चेंडूंचा सामना करताना 5 चौकारांच्या मदतीने 50 धावा फटकावल्या तर ऍनीने 30 धावा करत तिला साथ दिली.

तत्पुर्वी नाणेफेक गमावत प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियन महिला संघाची सुरुवात खराब झाली त्यांची सलामीवीर बेथ मूनी भोपळा ही न फोडता चौथ्याच चेंडूवर बाद झाली. मात्र त्या नंतर फलंदाजीस आलेल्या ऍशले गार्डनरने ऍलिसा हिलीला सोबत घेत केवळ 7.1 षटकात 62 धावांची भागीदारी केली. गार्डनरने केवळ 20 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 33 धावा फटकावल्या. गार्डनर बाद झाल्यानंतर लागलीच ऍलिसा देखील बाद झाल्याने इंग्लंडच्या गोलंदाजांमध्ये थोडेसे चैतन्य संचारले होते.

ऍलिसाने 24 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 33 धावा केल्या. या नंतर मेग लॅनींग आणि एलिसा व्हिलानी यांनी 12 षटकात 139 धावांची भागीदारी करत ऑस्ट्रेलियाला 200 धावांच्या पुढे मजल मारुण दिली. मेग लॅनींगने 45 चेंडूंचा सामना करताना 16 चौकार आणि 1 षटकार लगावत नाबाद 88 धावा केल्या तर एलिसा व्हिलानीने 30 चेंडूत 8 चौकार मारत 51 धावा फटकावताना तिला सुरेख साथ दिली.

संक्षिप्त धावफलक ऑस्ट्रेलियन महिला संघ – 20 षटकात 4 बाद 209 (ऍलिसा हिली 33, मेग लॅनींग नाबाद 88, एलिसा व्हिलानी 51, जेनी गन 38-2) विजयी विरुद्ध इंग्लंड महिला संघ 20 षटकात 9 बाद 152 (डॅनिएली वॅट 34, नताली स्किवर 50, ऍमी जोन्स 30, मेगन शूट 14-3)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)