तिरंगी टी-20 क्रिकेट मालिका; ऑस्ट्रेलियन महिला संघाचा इंग्लंडवर दणदणीत विजय

मुंबई – गोलंदाजांच्या प्रभावी कामगिरीमुळे इंग्लंडच्या महिला संघाचा 8 गडी राखून दणदणीत पराभव करताना ऑस्ट्रेलियन महिला संघाने तिरंगी टी-20 क्रिकेट मालिकेतील औपचारिक साखळी लढतीत विजयाची नोंद केली. या मालिकेतील तिसरा संघ असलेल्या भारतीय महिलांचे आव्हान संपुष्टात आल्यामुळे इंग्लंड व ऑस्ट्रेलियाच्या महिला संघांनी याआधीच अंतिम फेरीत धडक मारली आहे.

नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा ऑस्ट्रेलियन महिला संघाचा निर्णय योग्य असल्याचे दाखवून देताना त्यांच्या गोलंदाजांनी इंग्लंडच्या महिला संघाचा डाव 17.4 षटकांत 96 धावांत गुंडाळला. त्यानंतर 11.3 षटकांत 2 बाद 97 धावा फटकावताना ऑस्ट्रेलियन महिलांनी आधीच्या साखळी सामन्यातील पराभवाची परतफेड केली. ऑस्ट्रेलियाची एलिस पेरी सामन्याची मानकरी ठरली.

विजयासाठी केवळ 97 धावांच्या आव्हानासमोर ऑस्ट्रेलियन महिलांची 2 बाद 12 अशी निराशाजनक सुरुवात झाली होती. परंतु एलिस पेरीने केवळ 32 चेंडूंत 9 चौकारांसह नाबाद 47 धावा फटकावताना मेग लॅनिगच्या साथीत 9 षटकांत 85 धावांची अभेद्य बागीदारी करीत ऑस्ट्रेलियाचा विजय साकार केला. लॅनिगने केवळ 28 चेंडूंत 8 लचौकारांसह नाबाद 41 धावा फटकावल्या.

त्याआधी डेलिसा किमिन्सेने 20 धावंत 3, जेस जोनासेनने 21 धावांत 2, तर मेगॅन शुटने 13 धावांत 2 बळी घेताना इंग्लंडच्या महिलांचा डाव 96 धावांत रोखला. एलिस पेरी, आमांडा वेलिंग्टन व ऍश्‍ले गार्डनर यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. ऍलिस डेव्हिडसन-रिचर्डसने (24) जेनी गनच्या साथीत सातव्या गड्यासाठी केलेली 27 धावांची भागीदारी हे इंग्लंडच्या डावाचे एकमेव वैशिष्ट्य ठरले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)