तिची आगळीवेगळी जगभ्रमंती…

लंडन- जगात वेगळे काही तरी करणारी लोक बरीच असतात, जे आपल्या कामाने प्रसिद्ध होतात. अशीच एक आगळीवेगळी महिला इंग्लंडमध्ये आहे, जिने आपल्या कारलाच घर बनवले. ती याच कारने जगभ्रमंती करते. मरिना पिरो असे या महिलेचे नाव असून तिची कार म्हणजेच तिचे घर आहे. तसेच भ्रमंती करताना तिच्यासोबत असतो तो तिचा श्‍वान.

जगातला प्रत्येक कानाकोपरा पाहणे हे मरीनाचे स्वप्न असून तेच वेड तिला स्वस्थ बसू देत नाही. म्हणून ती तिची जुनी कार व तिच्या श्‍वानालासोबत घेऊन तिचे स्वप्न पूर्ण करण्यास निघाली आहे. मरिनाचा श्‍वानावर एवढा जीव आहे की, ती त्याला स्वतःपासून दूर ठेऊच शकत नाही.

मरिनाने कारला घरामध्ये रूपांतर केले आहे. तिला यासाठी सलग दोन महिने वेळ द्यावा लागला. घरातील सर्व सुविधा उपलब्ध अशी तिची कार आहे. कारमध्ये घरासारखे पडदे, उपयोगी वस्तू लावण्यात आले आहेत. एवढेच नाही तर आरामशिर बिछाणा आणि किचनही आहे. मरिना विमानानेही जग भ्रमंती करू शकली असती. मात्र बस, रेल्वे आणि विमान कंपन्या श्‍वानालासोबत घेऊ देत नाहीत. त्यामुळे तिने श्‍वानासोबत कारने प्रवास करण्याचे ठरविले, अशी मरिना सांगते. सध्या ब्रिटनमध्ये राहत असलेली मरिना मुळची इटलीत जन्मलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)