“ति’चा चरणस्पर्श तुळजाभवानीचा घटनेने खळबळ

उस्मानाबाद: शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशाचा वाद सुरु असतानाच तुळजापूर शहरातील काही महिलांनी तुळजाभवानी देवीचा चरणस्पर्श केल्याने खळबळ उडाली आहे. तुळजापूर आतल्या तुळजाभवानीला आजवर महिलांना चरण स्पर्श करू दिला जात नव्हता. या घटनेमुळे तुळजापुरात खळबळ उडाली आहे.

परंपरा मोडीत काढत तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन एका महिलेने देवीचे चरणस्पर्श करून पूजा केली. राज्याची कुलस्वामिनी मानल्या जाणाऱ्या तुळजाभवानी मंदिराच्या गर्भगृहात सर्वसामान्य महिलांना प्रवेश दिला जात नसे. अगदी माजी पंतप्रधान इंदिरा गांधींना सुद्धा परवानगी दिली नव्हती. मात्र, तुळजापूर शहरातीलच काही महिलांनी तुळजाभवानी देवीचा चरणस्पर्श केल्याने अनेक वर्षांची परंपरा मोडीत निघाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मंजुषा मगर असे या महिलेचे नाव आहे. त्यांनी देवीच्या गर्भगृहात जाऊन देवीची पूजा करत अनेक वर्षांची परंपरा मोडीत काढली. त्यांच्यासोबत अन्य काही पाळीकर पुजारी महिलाही होत्या, अशी माहिती आहे. आतापर्यंत देवीच्या पायाला हात लावून दर्शन घेण्याची लिखीत अनुमती नव्हती. या संदर्भात काही महिला जिल्हाधिकाऱ्यांना जाऊन भेटल्या. मंदिर संस्थांच्या कुठल्या रेकॉर्ड किंवा नियमात हे आहे का? याची विचारणा केली. त्यासंदर्भात नियम नाहीत हे लक्षात आल्यानंतर काल रात्री या महिला मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करत देवीचा चरणस्पर्श केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)