तिकोना गड : पवनमावळचा पहारेकरी

लोणावळा – तिकोना ऊर्फ वितंडगड हा किल्ला इ. स. 1585 च्या सुमारास निजामशाहीचा सरदार मलिक अहमद निजामशहा याने जिंकला आणि किल्ला निजामशाहीत सामील झाला. लोहगड आणि विसापूर या किल्ल्यांच्या मागे पवनमावळ प्रांतात असणाऱ्या या गडा बद्दलचा इतिहास फारसा कुठेही उपलब्ध नाही. शिवरायांनी 1657 मध्ये जुन्या निजामशाहीतील माहुली, लोहगड, विसापूर, सोनगड, तळा व कर्नाळा या किल्ल्यांसोबत हा किल्ला देखील आपल्या स्वराज्यात सामील करुण घेतला व सर्व निजामशाही कोकण शिवरायांच्या हाताखाली आले. या किल्ल्याचा उपयोग संपूर्ण पवनमावळावर देखरेख ठेवण्यासाठी होत असे.

सन 1660 मध्ये या भागाच्या सुरक्षिततेसाठी नेताजी पालकर यांची नियुक्‍ती झाली. 12 जून 1665 पुरंदर तहानुसार 18 जूनला कुबादखानाने हलालखान व अन्य सरदारांसोबत या परिसराचा ताबा घेतला. इ.स 1682 च्या ऑगस्ट महिन्यात संभाजी व अकबर यांची भेट झाली या भेटीनंतर अकबर तिकोना किल्ल्यावर राहण्यास आला. मात्र येथील हवा न मानवल्याने त्याला जैतापूर येथे धाडण्यात आले. इ. स. 1818 मध्ये किल्ल्यावर छोट्याफार प्रमाणात लढाई झाली, यात किल्ल्याचे बऱ्याच प्रमाणावर नुकसान झाले. आजमितीस किल्ल्याची मोठया प्रमाणावर पडझड झाली आहे.

-Ads-

अख्खा मावळप्रांत नजरेत…
गडाचा घेरा फार मोठा नसल्यामुळे एक तासात सर्व गड पाहून होतो. गडाच्या दरवाजातून आत शिरल्यावर डावीकडे थोडे अंतर चालून गेल्यावर एक पाण्याचे टाके आणि गुहा लागते. गुहेत 10 ते 15 जणांची राहण्याची होते. मात्र पावसाळ्यात गुहा राहण्यास अयोग्य आहे. गुहेच्या बाजूने वर जाणारी वाटेने थेट बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी पोचतो. प्रवेशद्वाराच्या पायऱ्या या दमछाक करणाऱ्या आहेत. दरवाजातून आत शिरल्यावर उजवीकडे पाण्याची टाक आहेत, तर डावीकडे तटबंदीचा बुरूज दिसतो.

सरळ थोडे वर गेल्यावर एक वाट उजवीकडे उतरते. येथे पाण्याची काही टाकी आढळतात. येथून माघारी फिरून सरळ वाटेला लागावे. ही वाट आपल्याला काही तुटलेल्या पायऱ्यांपाशी घेऊन जाते. येथून वर गेल्यावर समोरच महादेवाचे मंदिर आहे. मंदिरामागे पाण्याचा मोठा खंदक आहे. याला वळसा घालून गेल्यावर आपण ध्वजस्तंभाच्या जागी पोचतो. बालेकिल्ल्यावरुन समोरच उभा असणारा तुंग, लोहगड, विसापूर, भातराशीचा डोंगर, मोर्सेचा डोंगर, जांभुळीचा डोंगर, पवनेचा परिसर आणि पवना धरण हा सर्व परिसर न्याहाळता येतो. गडावरून संपूर्ण मावळप्रांत आपल्या नजरेत येतो. अशा प्रकारे 4 तासांत संपूर्ण गड पाहून परतीच्या प्रवासाला लागू शकतो. सर्व गड फिरण्यास 1 तास पुरसा ठरतो.

“ट्रेकर्सचा फ्रेन्ड’
अनेक ट्रेकर्स लोहगड, विसापूर, बेडसे लेणे आणि तिकोना असा ट्रेकही करतात. यासाठी बेडसे लेण्या करुण तिकोनापेठेत जाता येते. ब्राम्हणोली मार्गे अनेक ट्रेकर्स तुंग आणि तिकोना असा ट्रेकही करतात. यासाठी तुंग किल्ला पाहून तुंगवाडीत उतरावे आणि केवरे या गावी यावे येथून लॉंचने पलिकडच्या तीरावरील ब्राम्हणोली या गावी यावे. ब्राहणोली ते तिकोनापेठ हे अंतर 30 मिनिटांचे आहे. तिकोनापेठ मार्गे गडावर जाणारी मुख्य वाट ही तिकोनापेठ या गावातून जाते. यासाठी लोणावळ्याच्या दोन स्टेशन पुढच्या कामशेत स्टेशनवर उतरावे.

कामशेत ते काळे कॉलनी बस पकडून काळे कॉलनीमध्ये उतरावे. कामशेत ते काले कॉलनी अशी बस सेवा अथवा जीपसेवा उपलब्ध आहे. काळे कॉलनी ते तिकोनापेठ अशी देखील जीपसेवा उपलब्ध आहे. या बसने किंवा जीपने तिकोनापेठ गावं गाठावे. तिकोनापेठेतून 45 मिनिटांत आपण किल्ल्यावर पोचतो. वाट फार दमछाक करणारी नसून, अत्यंत सोपी व सरळ आहे. किल्ल्यावरील दरवाजातून आत शिरल्यावर डावीकडे एक वाट जाते, या वाटेने 20 मिनिटांतच बालेकिल्ला गाठता येतो.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)