तिकोणा गडाच्या संवर्धनासाठी आर्थिक मदत

वडगाव मावळ, (वार्ताहर) – गुढीपाडव्यानिमित्त वडगाव मावळ उपसभापती प्रवीण चव्हाण, मावळ फेस्टिवल अध्यक्ष शामराव ढोरे, सरपंच नितिन कुडे यांनी तिकोणा गडाच्या संवर्धनासाठी 21 हजार रुपयांची मदत केली आहे.

तिकोणा गड हा मावळातील महत्वाची ऐतिहासिक वास्तू आहे. हा वारसा जपून त्याचे संवर्धन करायला हवे. या जाणिवेतून हा मदतनिधी उभारण्यात आला आहे. तिकोणा गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. मात्र, या पायऱ्यांची काळाच्या ओघात मोठी पडझड झाली. त्याच्या संवर्धनासाठी या निधीचा वापर करण्यात येणार आहे.
चव्हाण, ढोरे आणि कुडे यांनी मावळ फेस्टिवलचे यशस्वी आयोजन करून वडगाव मावळातील कला, क्रीडा, व संस्कृतीची जपणूक केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)