व्याख्यान, कीर्तनाचीा रेलचेल
कामशेत – गडकिल्ल्यांचे संवर्धन व संरक्षण व्हावे, याकरिता एक प्रयत्न म्हणून किल्ले तिकोणागडावर यंदापासून गणेशोत्सवाची सुरवात करण्यात आली आहे. गुरुवारी गडावर गणेशाचे पारंपरिक पद्धतीने आगमन झाले.

या उत्सवाकरिता कामशेत येथील चंद्रकांत लोळे यांचेकडून पर्यावरण पूरक शाडूची गणेश मूर्ती घेण्यात आली. त्यानंतर मावळ परिसरातील शिवभक्‍त गड पायथ्याशी एकत्र आले. गणेशाच्या स्वागताकरिता मावळे, अब्दागिरी, भगवा झेंडा तयार होते. टाळ-मृदुंगाच्या निनादामध्ये भक्‍तीमय वातावरणात श्री गणेशाचे गडाकडे प्रस्थान झाले.

गणेशजी, देवडी गुहा, वेताळाचा माळ, चपेटदान मारूती राय मार्गाने गडमथ्यावरील तळजाई माता लेणीजवळ गणपती बाप्पा पोहचले. त्यांच्या स्वागताकरिता मांडव घालून रांगोळी काढण्यात आली होती. आकर्षक आरास करून मधुर आवाजात गणेशाची गाणी वाजविण्यात आली होती. त्यानंतर गणेश मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली. या ठिकाणी आलेल्या पर्यटकांना गडावर श्री गणेश विराजमान झालेले आश्‍चर्य वाटले.

त्यानंतर गडमाथ्यावरील वितंडेश्‍वराच्या मंदिरात पूजा करण्यात आली. श्री गणेश मूर्तीजवळ काही मावळे मुक्‍कामी थांबले बाकी गड-उतार झाले. किल्ले तिकोणागडावर गणेशोत्सवानिमित्त रविवारी (दि. 16) डॉ. प्रमोद बोऱ्हाडे यांचे “किल्ले तिकोणागड समग्र इतिहास’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे दुपारी 3 वाजता ह.भ.प.अशोक महाराज आडकर यांचे कीर्तन ठेवण्यात आले आहे. या कार्यक्रमाला शिवभक्‍तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या वेळी मनोहर सुतार, संतोष गोलांडे, गुरूदास मोहळ, माऊली मोहळ, अक्षय औताडे, किरण चिमटे, डॉ. सुधीर ढोरे, सागर वाळुंज, प्रफुल्ल बावीस्कर व शिवभक्‍त उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)