तिकीट मागितले म्हणून बस वाहकास मारहाण

तिकीट मागितले म्हणून बस वाहकास मारहाण
पुणे,दि.23 (प्रतिनिधी)- तिकीट मागितले म्हणून पीएमपी बसच्या वाहकास मारहाण करण्यात आली. याप्रकरणी दोघांना वानवडी पोलीसांनी अटक केली आहे.
आल्फेश शरीफ मुलाणी(22,रा.लोहीयानगर) व सरफराज अनिश शेख(33,रा.लोहीयानरग) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
फिर्यादी ज्ञानेश्‍वर काकडे(33, हडपसर) हे पीएपीएलमध्ये वाहक म्हणून काम करतात. चालक नवनाथ यांच्यासह ते आळंदी व स्वारगेट या मार्गावरील बस घेऊन चालले होते. यावेळी आरोपींनी आंबेडकर शाळेसमोर बस थांबवून त्यामध्ये प्रवेश केला. तेव्हा फिर्यादीने त्यांना तिकीटाचे पैसे मागितले. याचा राग मनात येऊन दोघाही आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. यानंतर त्यांच्या खांद्यावर असलेली बॅग व तिकीटाची जमा झालेली 1075 रुपयांचे रोख रक्कम हिसकावून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र चालक व प्रवाशांनी दोघांनाही पकडून पोलीसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अजय म्हेत्रे तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)