तासिका तत्वावरील अध्यापकांच्या मानधनात वाढ – विनोद तावडे

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा भरतीचा मार्ग मोकळा

मुंबई: विद्यापीठे व महाविद्यालयीन शिक्षक व  शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा भरतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. महाराष्ट्र शासन ‍शिक्षक व शिक्षकेतर भरती करणार असून आता महाविद्यालयांना या जागा भरण्याची अनुमती दिली जाईल. त्याच बरोबर तासिका तत्वावरील अध्यापकांच्या मानधनामध्येसुद्धा वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज दिली.

राज्यातील विद्यापीठे व  वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये अनेक वर्षे पदे रिक्त असल्याबाबत चर्चा ही सर्वदूर सुरु होती. यामुळे होणारे विद्यार्थ्यांचे नुकसान लक्षात घेता केवळ तासिका तत्वावर अध्यापक भरती न होता आता थेट अध्यापक भरती करण्यात येईल.

अध्यापकांच्या 3 हजार 580 जागा, शारीरिक शिक्षण  संचालनालयातील 139 जागा, ग्रंथपालांच्या 163 जागा आणि प्रयोगशाळा सहाय्यकांच्या 856 जागा अशी एकूण 4 हजार 738 पदे  येत्या काळात भरण्यात येतील असेही तावडे यांनी सांगितले.

तसेच, तासिका तत्वावरील बहुतांश अध्यापकांचे मानधन दुप्पट करण्यात आले असून त्यामध्येसुद्धा घसघशीत वाढ करण्यात आली आहे.  महाविद्यालय व विद्यापीठातील ही पदभरती उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या प्रचलित धोरणानुसार केली जाईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)