तासगावात गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; आरोपी फरारी


महिला सातारा जिल्ह्यातील माण तालुक्‍यातील


घटनेची वरिष्ठ पातळीवर दखल


महिला आयोगाने घेतली दखल

सांगली – आठ महिन्यांच्या गर्भवती महिलेवर 8 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सांगलीतील तुरची फाटा (तालुका तासगाव) येथील ही संतापजनक घटना आहे.

पीडित महिलेच्या पतीला कारमध्ये डांबून ठेवून आठ जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. ही घटना मंगळवारी (31 जुलै) मध्यरात्रीची आहे. याप्रकरणी एकाही संशयिताचे नाव व पत्ता शोधण्यात यश न आल्याने या गुन्ह्याचा छडा लावणे तासगाव पोलिसांसमोर एक आव्हान बनले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सागर, मुकुंद माने, जावेद खान, विनोद अशी अपूर्ण चार संशयितांची नावे सध्या तरी पोलिसांच्या तपासातून पुढे आली आहेत, तर अन्य चार जणांची ओळख अद्याप पटलेली नाही. जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागालाही तपासाचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांचे पथक तासगावमध्ये तळ ठोकून आहे. संशयित तुरची परिसरातील असावेत, असा संशय आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी पुढील तपासाला दिशा दिली आहे.

पीडित महिला माण (सातारा) तालुक्‍यातील आहे. गेल्या काही महिन्यांपासून ती पतीसह उदरनिर्वाहासाठी तुरची फाट्यावर स्थायिक झाली आहे. त्यांनी हॉटेल व्यवसाय सुरु केला आहे. त्यांच्या हॉटेलमध्ये कामासाठी विवाहित जोडप्याच्या शोधात ते होते. त्यांनी काही ग्राहकांना, असे एखादे जोडपे आहे का, हे पाहण्यास सांगितले होते. मंगळवारी रात्री संशयित मुकुंद माने याने पीडित महिलेच्या पतीशी मोबाइलवर संपर्क साधून, तुम्हाला हॉटेल कामासाठी पाहिजे असलेले जोडपे मिळाले आहे, त्यांना भेटण्यासाठी तुम्ही तुरची फाट्यावर या, असे सांगितले. तसेच या जोडप्यास ऍडव्हान्स देण्यास 20 हजार रुपये घेऊन येण्यासही सांगितले.

पीडित महिला व तिचा पती तुरची फाटा येथील एका चाळीजवळ पैसे घेऊन गेले असता, मुकुंद माने याने त्याच्यासोबत असलेल्या सागर यास “या दोघांना मारा’ असे सांगितले. त्यानुसार सागरने या दाम्पत्यास प्लॅस्टिकच्या पाईपने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पीडित महिलेच्या गळ्यातील तीन तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र, दीड तोळ्याची सोनसाखळी व वीस हजाराची रोकड काढून घेतली. यादरम्यान, दुचाकीवरून आणखी चौघे संशयित तेथे आले. त्यांनी पीडित महिलेच्या पतीला बाहेर उभ्या असलेल्या मोटारीमध्ये डांबून ठेवले व महिलेला तेथीलच एका खोलीत नेले.

संशयितांची दाम्पत्याला दमदाटी
पीडित महिला सोडून देण्याची विनवणी करत होती. मात्र, आठही संशयितांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिच्या पतीला मोटारीतून तिच्याजवळ आणून सोडले. संशयितांनी या दाम्पत्याला इथून गप निघून जायचे. पोलिसांत जाऊ नका, तुमचे कोणी ऐकणार नाही. मी इथलाच आहे, असे सांगून दमदाटी केली. रात्री उशिरा दाम्पत्याने तासगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. सहायक पोलीस निरीक्षक उमेश दंडिले तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)