तावशीत भैरवनाथ प्रतिष्ठानचा “गोविंदा रे गोपाळा’

कुरवली – तावशी (ता. इंदापूर) येथील भैरवनाथ प्रतिष्ठानच्या वतीने सोमवारी (दि. 10) रात्री दहीहंडी माळेगाव (ता. बारामती) येथील लहुजी वस्ताद संघच्या गोविंदा पथकातील गोपाळांनी सहा थर लावून फोडली. याप्रसंगगी बारामती नगरपालिका नगरसेवक बबलू देशमुख, समर्थ प्रतिष्ठान अध्यक्ष तथा उद्योजक संतोष सातव, नगरसेवक दिनेश जगताप, छत्रपती सहकारी साखर कारखाना संचालक रसिक सरक, दयाराम सरक, भाजपचे अभिजीत देवकाते, सामाजिक कार्यकर्ते अविनाश भिसे उपस्थित होते. यावेळी पर्यावरण व वृक्ष संवर्धनचा संदेश देत मान्यवरांना प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा उपसरपंच युवराज सरक, आयोजक वैभव नकाते, प्रतिष्ठान अध्यक्ष समीर धुमाळ, उपाध्यक्ष आकाश आवळे, खजिनदार औदुंबर जाधव यांनी रोपटे देऊन त्यांचे स्वागत केले. दरम्यान, ग्रामस्थांच्या मनोरंजनासाठी धमका ऑर्केस्ट्रॉच्या नृत्यांगना यांनी विविध हिंदी-मराठी गीतावर नृत्य सादर केले. तर दहीहंडी फोडणाऱ्या लहुजी वस्ताद गोविंदा पथकातील गोविंदाना 55 हजार 555 रुपयांचे बक्षिस व चषक देवून गौरवण्यात आले. यावेळी तंटामुक्‍ती अध्यक्ष महादेव कवडे, पोलीस पाटील सागर खरात, ग्रामसेवक योगेश करे, राजेंद्र थोरात, भागवत गायकवाड, चंद्रकांत सपकळ, सामाजिक कार्यकर्ते अशोक व्होरकाटे, किसन संकुडे, अनिल सूर्यवंशी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)