“तालेरा’तील महिला शस्त्रक्रिया विभाग सुरू

पिंपरी – चिंचवड येथील तानाजीनगर परिसरात सुसज्ज स्वरुपातील महापालिकेचे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (तालेरा) रुग्णालय बांधण्यात आले आहे. या रुग्णालयात स्त्रियांशी संबंधित आजारावरील शस्त्रक्रिया विभाग काही तांत्रिक कारणाने बंद ठेवण्यात आला होता. मात्र, तांत्रिक त्रुटी दूर करुन गेल्या आठवड्यापासून शस्त्रक्रिया विभाग पुन्हा सुरु करण्यात आल्याची माहिती, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. वीणादेवी गंभीर यांनी दिली.

तालेरा रुग्णालयात प्रशस्त असून त्या ठिकाणी स्वच्छता, लिफ्ट आदी सोयींयुक्त सुविधा आहेत. मात्र, या रुग्णालयातील ऑपरेशन थिएटर काही दिवस बंद ठेवल्याने रुग्णांना दुसरा पर्याय शोधावा लागत होता. रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभाग पुन्हा सुरु झाल्याने रुग्णांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला आहे.
शस्त्रक्रिया विभाग बंद असल्याने रुग्णांची होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन प्रशासनाने तत्काळ तांत्रिक अटी दूर केल्या. रुग्णालयाची इमारत नवीन व प्रशस्त आहे. येथे प्रसुतिगृह, ओ.पी.डी., बालरोग, दंतरोग, गरोदर माता तपासणी, क्षयरोग, त्वचा रोग यावर उपचार केले जातात. सोनोग्राफी, प्रयोगशाळा, एक्‍स-रे या सुविधा उपलब्ध आहे. राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत लसीकरण केले जाते. कुटुंब कल्याण योजनेअंतर्गत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्या जातात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सद्यस्थितीत असलेल्या रुग्णालयापासून जवळच जुने रुग्णालय होते. त्या जुन्या जागेवर रुग्णालयासाठी नवीन इमारत बांधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. परंतु, सध्या रुग्णालयाचा फक्त पाया खोदून झाला आहे. नवीन इमारत उभी राहून रुग्णालय सुरू होण्यासाठी किमान चार-पाच वर्षे लागण्याची शक्‍यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)