तालुक्‍यात एकही रस्ता खराब दिसणार नाही – आमदार सोनावणे

नारायणगाव- जुन्नर तालुका महाराष्ट्र राज्यातील आदर्श व मॉडेल तालुका विकासाच्या दृष्टीने राहील अशी ग्वाही देत जुन्नर तालुक्‍यातील रस्त्यांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून 784 कोटी रूपये मंजूर झालेले असून मे 2019 पर्यंत तालुक्‍यातील सर्व रस्ते पूर्ण होऊन एकही रस्ता खराब दिसणार नाही, अशी ग्वाही जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी वारूळवाडी येथे दिली.
वारुळवाडी ग्रामपंचायतीच्या 3 कोटी रुपयांचे ग्रामसचिवालय भूमिपुजन सोहळा, तसेच 30 लक्ष रुपयांचे पशुवैद्यकीय दवाखाना भूमिपूजन आणि कै. भिकाजी दगडू फुलसुंदर यांच्या स्मरणार्थ फुलसुंदर परिवार व श्री भागेश्वर देवस्थान, मुक्ताई देवस्थान यांचे वतीने 5 लाख 51 हजारांच्या वैकुंठ रथ लोकार्पण सोहळा आमदार सोनवणे, युवा नेते अमित बेनके, उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी तालुका प्रमुख माऊली खंडागळे, विघ्नहरचे संचालक संतोष खैरे, अर्चना माळवदकर, रमेश खुडे, एम.डी.भुजबळ, नारायणगावचे सरपंच योगेश (बाबू) पाटे, उपसरपंच संतोष दांगट, सुजित खैरे, संजय वारुळे, जालिंदर कोल्हे, आशिष फुलसुंदर, वारूळवाडीचे सरपंच जोत्स्ना फुलसुंदर, उपसरपंच सचिन वारुळे,बबन काळे, जंगल कोल्हे ,सुलोचना काळे, विपुल फुलसुंदर, राजेंद्र मेहेर, परशुराम वारुळे, भाग्यश्री पाटे, खुशाल काळे, वर्षा व-हाडी, माया डोंगरे, सविता पारधी, मनाबाई भालेराव, जयश्री बनकर, सुनिता बटाव, अंजली संते, ईश्वर अडसरे, दशरथ जाधव, बाळू वारुळे ,रोहित डोंगरे ,ग्रामविकास अधिकारी विद्याधर मुळूक, आदी मान्यवर उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)