तालुका ऍथलेटिक्‍समध्ये कृष्णराव भेगडे शाळेची बाजी

तळेगाव-दाभाडे – तळेगाव विद्या प्रतिष्ठान संचालित कृष्णराव भेगडे इंग्लिश मिडीयम स्कूलने तालुका ऍथलेटिक्‍स मैदानी स्पर्धेत विविध प्रकारात बाजी मारली. रामभाऊ परूळेकर शाळेत स्पर्धा झाल्या. 17 वर्षांखालील मुलींच्या गटात उंच उडीत प्रीती यादव प्रथम, 3000 मीटर धावणे स्पर्धेत आंचल पांडे दुसरी आली. 1500 मीटर धावणे स्पर्धेत सेजल लिमन दुसरी व उंच उडीत प्रथम आली. तिहेरी उडीत आलिया शेख प्रथम, 4 बाय 400 मीटर रिलेत संजना पवार, आंचल पांडे, सेजल लिमन, श्रृती दाभाडे प्रथम, उंच उडीमध्ये भावना भांगरे प्रथम, भाला फेक व लांब उडीत वैष्णवी शिंदे द्वितीय, 14 वर्षाखालील गटात श्रावणी ढोरे 400 मीटर धावणे शर्यतीत प्रथम व 600 मीटर धावणे शर्यतीत दुसरी, लांब उडीत दुसरी तर अनुष्का शेवकर थाळी फेकमध्ये द्वितीय व गोळाफेकमध्ये तिसरी आली.

17 वर्षांखालील मुलांच्या गटात अथर्व भेगडे उंच उडीत प्रथम, तिहेरी उडीत सुरज गाडे प्रथम, गोळा फेकमध्ये आदित्य गायकवाड प्रथम, थाळी फेकमध्ये पाबुसिंग राठोड तृतीय, उंच उडीत धनंजय बोरसे तृतीय, 3000 मीटर धावणे स्पर्धेत अभिषेक बोगाटी द्वितीय, 1500 मी. धावणेत सुनील मुहाल तृतीय आले. शिक्षक गोरख काकडे व सुवर्णा झणझणे यांचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले. संस्थापक चंद्रकांत काकडे, अध्यक्ष संदिप काकडे, दिलीप भोगे व मुख्याध्यापिका मीना अय्यर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)