तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत विघ्नहर चॅम्पियन

ओझर- जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे द्वारा आयोजित तालुकास्तर हॉलीबॉल स्पर्धेत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या श्री विघ्नहर विद्यालय ओझरने तालुक्‍यात चॅम्पियनशिप प्राप्त केली, अशी माहिती मुख्याध्यापक विलास दांगट यांनी दिली.
नुकत्याच ओझर (ता. जुन्नर) येथे पार पडलेल्या तालुकास्तर हॉलीबॉल स्पर्धेत 14, 17 आणि 19 वर्षे वयोगटातील मुले आणि मुली असे विविध शाळांमधील 44 संघ सहभागी झाले होते. यावेळी अत्यंत चुरशीच्या झालेल्या स्पर्धेत विघ्नहर विद्यालयालाच्या 14 वर्षे मुले, मुली, 17 वर्षे मुले, मुली आणि 19 वर्षे मुली या 5 संघांनी प्रथम क्रमांक मिळवित चॅम्पियनशिपची परंपरा कायम राखली आहे. या संघांची निवड बारामती येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेकरीता झाली आहे.
या सर्व खेळाडूंना क्रीडाशिक्षक गणेश राऊत यांनी मार्गदर्शन केले. या सर्व विद्यार्थी आणि मार्गदर्शकांचे श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट, सरपंच, उपसरपंच, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ ओझर यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)