तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात कलेढोणच्या हणमंतराव साळुंखे विद्यालयाचे यश

मायणी – तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात कलेढोण येथील समाजभूषण हणमंतराव साळुंखे विद्यालयाचे यांनी तयार केलेल्या बहुउद्देशीय औषध फवारणी यंत्रास तृतीय क्रमांक मिळाला असून उपकरणाची जिल्हास्तरावर निवड झाली. तसेच कु. समृद्धी लावंड हिचा वक्तृत्व स्पर्धेत प्राथमिक गटात द्वितीय क्रमांक मिळाला. तसेच कु. श्रावणी वायदंडे व कु.समृद्धी घाडगे यांचा प्रश्‍नमंजुषा स्पर्धा मोठा गटात तृतीय क्रमांक मिळाला.

बहुउद्देशिय औषध फवारणी यंत्र उपकरणासाठी सानप व तोडकर यांचे मार्गदर्शन लाभले. समृद्धी लावंडला वक्तृत्व स्पर्धेसाठी खंदारे यांचे मार्गदर्शन लाभले तर घाडगे व वायदंडे यांना लावंड, पिसे व चौरे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन मिलिंद साळुंखे, संजीव साळुंखे, मुख्याध्यापक देशपांडे, पर्यवेक्षक जाधव व शिक्षकांनी अभिनंदन केले.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)