तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा उत्साहात

अवसरी- अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील विद्याविकास मंदिर या शाळेत तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा संपन्न झाल्या. यामध्ये तालुक्‍यातील सत्तेचाळीस संघ सहभागी झाले होते, अशी माहिती प्राचार्य आर. बी. हळदे यांनी दिली.अवसरी बुद्रुक येथील विद्याविकास मंदिर येथे पुणे जिल्हा क्रीडा परिषद आणि विद्याविकास मंदिर अवसरी यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात उद्योजक गोविंद खिलारी, सरपंच पवन हिले, उपसरपंच सचिन हिंगे, बाबाजी दाभाडे, गणपत हिंगे समवेत शिक्षक, ग्रामस्थ, तालुक्‍यातील विविध शाळांमधील विद्यार्थी उपस्थित होते. गोविंद खिलारी म्हणाले की, आजचा विद्यार्थी क्रीडा क्षेत्रात अग्रेसर राहण्यासाठी शासनाबरोबरच सामाजिक संस्थांनी देखील पुढाकार घेणे गरजेचे आहे. त्यांना सोई-सुविधा उपलब्ध करून दिल्या तर तो क्रीडा क्षेत्रात भरीव कामगिरी करू शकतो. स्पर्धेसाठी सतरा वयोगटातील मुलांचे एकोणतीस तर मुलींचे अठरा संघ सहभागी झाले होते. कार्यक्रमाची व्यवस्थापन विद्याविकास मंदिराचे प्राचार्य आर. बी. हळदे यांनी केले. सूत्रसंचालन अंकुश शिंगाडे तर प्रास्ताविक ए. एम. टाव्हरे यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)