तालुकाध्यक्षपदी माणिकराव झेंडे पाटील यांची निवड

जवळार्जून- पांडेश्वर गावचे सुपुत्र, कडेपठार ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन माणिकराव झेंडे पाटील यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली. निवडीचे पत्र बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष जालिंदर कामठे यांच्या उपस्थित देण्यात आले. झेंडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा पुरंदर तालुक्‍यात नव्या जोमाने उभा करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. झेंडे पाटील यांना नव्या जुन्या नेते कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन पक्षाची बांधणी करावी लागणार आहे. झेंडे पाटील यांच्याकडे असलेले संघटन कौशल्य तालुक्‍यातील सर्व भागांतील कार्यकर्त्यांशी असणारी जवळीक त्यांना फायदेशीर ठरेल, असा विश्वास वाटतो. तळागाळातील लोकांशी असणारा दांडगा जनसंपर्क जनतेला बरोबर घेऊन काम करण्याची क्षमता व लोकांविषयी असणारी जाणीव त्यांना उपयोगी येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)