तालीम संघ होणार आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल

मुख्यमंत्र्यांकडून विशेष अडीच कोटी रूपयांचा निधी

सातारा,दि. 12 प्रतिनिधी- तब्बल साठ वर्षापुर्वी स्थापन झालेला सातारा तालीम संघाचे रूपडे आता पालटणार आहे. तालीम संघाच्या जागी आता आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल उभारण्यात येणार असून त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अडीच कोटी रूपयांचा निधी दिला आहे, अशी माहिती तालीम संघाचे अध्यक्ष साहेबराव पवार यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी तालीमसंघाचे चेअरमन अमर जाधव, उपाध्यक्ष संदीप साळुंखे, बलभीम शिंगरे, सुधीर पवार, चंद्रकांत सुळ, वैभव फडतरे, जीवन कापले, सुर्यकांत पवार आदी.उपस्थित होते.
नव्याने उभारण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाचे भूमीपुजन दि.20 जानेवारी रोजी सकाळी 11.30 वाजता साहेबराव पवार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, तालीम संघाचे संचालक व माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर, आ.शंभूराज देसाई, हिंदकेसरी श्रीपती खेचनाळे, हिंदकेसरी दिनानाथ सिंह, हिंदकेसरी दादू चौगुले आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे. साठ वर्षापुर्वी साहेबराव पवार, श्रीरंग अप्पा जाधव व धोंडीराम शिंगरे यांच्या प्रयत्नातून सातारा तालीम संघाची स्थापना झाली. तद्‌नंतर आज पर्यंत अनेक महाराष्ट्र व उपमहाराष्ट्र केसरी तालीम संघाने घडविले त्याचबरोबर ऑलम्पिकमध्ये देखील तालीम संघाच्या मल्लांचा समावेश झाला होता. त्यामुळे कुस्तीतील मानबिंदू म्हणून सातारा तालीम संघाची ओळख निर्माण झाली होती. मात्र, आता बदलत्या कुस्ती प्रकार व त्यासाठी आवश्‍यक सुविधा लक्षात घेवून पदाधिकाऱ्यांनी संकुलाचा आराखडा तयार केला व त्यानंतर तालीमसंघाचे संचालक व जिल्हा परिषद सदस्य दिपक पवार यांनी मुख्यमंत्र्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर संकुलासाठी पहिल्या टप्प्यासाठी अडीच कोटी रूपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.

या निधीमध्ये तालीमसंघाच्या तीन एकर परिसरात तीन बाजूने प्रेक्षक गॅलरी व चौथ्या बाजूला आंतरराष्ट्रीय संकुलाची इमारत उभारण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात मार्च अखेर पर्यंत 10 हजार 230 स्क्वेअर फुट इमारतीचे बांधकाम व सुविधा निर्माण करण्यात येणार असून तद्‌नंतर निधी उपलब्ध होताच एकूण 20 हजार 600 स्क्वेअर फुट इमारतीचे बांधकाम पुर्ण करण्यात येणार आहे. संकुलाला आंतरराष्ट्रीय तालीम संघाचा दर्जा असणार आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय नियमानुसार बांधकाम व सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामध्ये सर्व कुस्ती प्रकारासाठी आखाडा तसेच मॅट, डायस व स्टिम बाथची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती सुधीर पवार यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)