तालिबान आणि अमेरिकेतील चर्चा चौथ्या दिवशीही सुरु 

काबूल –  तालिबान आणि अमेरिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये कतार येथे सुरु असलेली चर्चा चौथ्या दिवशीही सुरु राहिली. अफगाणिस्तानमध्ये 17 वर्षांपासून सुरु असलेल्या संघर्षाला समाप्त करण्यासाठी संभाव्य तोडग्याबाबत चर्चा सुरु आहे. ही चर्चा अजूनही सुरुच आहे. या चर्चेतून निष्कर्श निघाला की त्याबाबत सांगितले जाईल, असे तालिबानी प्रवक्‍ता झबिहुल्लाह मुजाहिद यांने वृत्तसंस्थेला सांगितले.

अफगाणिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी अमेरिकेच्यावतीने पुढाकार घेतला आहे. अफगाणिस्तानमधील सरकारमध्ये तालिबानचा सहभाग असावा यासाठी प्रयत्न केले जात आहे. अमेरिकेने अफगाणिस्तानातून सैन्य माघारी बोलावले जाण्याबाबतही दोन्ही बाजूंकडून चर्चा केली जात आहे, असे तालिबानच्या वरिष्ठ कमांडरने पाकिस्तानातील अज्ञात ठिकाणावरून वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयानेही या चर्चेबाबतच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र या संदर्भात काबुलमधील अमेरिकेच्या दूतावासाकडून आणि “नाटो’कडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. अमेरिका आणि तालिबानमधील चर्चेला मंगळवारपासून कतारमध्ये पुन्हा सुरुवात झाली. अमेरिकेचे विशेष दूत झालमाय खालिलझाद हे तालिबानी म्होरक्‍यांशी ही चर्चा करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)