तालिबानी हल्ल्यामध्ये अफगाणमधील 11 सैनिक ठार

काबुल – अफगाणिस्तानातील उत्तरेकडील सारी पुल प्रांतात चेकपॉईंटवर तालिबान्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये निमलष्करी दलाचे 11 सैनिक ठार झाले. सारी पुल प्रांताच्या राज्यपालांच्या प्रवक्‍त्याने याबाबतची माहिती दिली. शनिवारी झालेल्या चकमकीमध्ये आणखी दोघे सैनिकही जखमी झाले तर तीन दहशतवादी मारले गेले, असेही या प्रवक्‍त्याने सांगितले. सरकारला समर्थन देणाऱ्या “लोकल अपरायजिंग फोर्सेस’ या गटावर दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता. कोणत्याही दहशतवादी संघटनेने अद्याप या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. मात्र हा हल्ला तालिबान्यांनीच केला असल्याचा दावा राज्यपालांच्या प्रवक्‍त्याने केला आहे.

अफगाणिस्तानात अन्यत्र दोन ठिकाणीही दहशतवाद्यांनी चेकपॉईंटवर हल्ले केले. गझनी प्रांतात हे हल्ले झाले. त्यामध्ये किमान चार पोलिस ठार झाले, तर पाच जण जखमी झाले. गुरुवारी रात्रीही तालिबान्यांनी गझनीप्रांतातील सरकारी कार्यालयावर हल्ला केला होता. त्यामध्ये 15 जण ठार झाले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)