तालिबानशी चर्चेची शक्‍यता ट्रम्प यांनी फेटाळली

संयुक्‍त राष्ट्राच्या शिष्टमंडळासोबत चर्चा

वॉशिंग्टन – अफगाणिस्तानमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या आत्मघातकी हल्ल्यांच्या पार्श्‍वभुमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तालिबानशी कोणत्याही चर्चेची शक्‍यता फेटाळून लावली आहे. आठवड्याभरामध्ये तालिबानी हल्ल्यामध्ये किमान 130 जण ठार झाले आहेत. त्यामुळे तालिबानला नष्टच केले पाहिजे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. संयुक्‍त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या शिष्टमंडळाने ट्रम्प यांची भेट घेतली आणि अफगाणिस्तानमधील स्थितीबाबत चर्चा केली. तेंव्हा ट्रम्प यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. चर्चेसाठी अजून अवधी आहे. मात्र आतापर्यंत खूप अवधी निघूनही गेला आहे, असे ट्रम्प म्हणाले.

-Ads-

तालिबानने गेल्या आठवड्यात अफगाणिसानमध्ये दोन भीषण आत्मघातकी हल्ले केले आहेत. त्यातील काबुलमधील हल्ल्यात एका रुग्णवाहिकेद्वारे मोठा बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला. त्यामध्ये 100 पेक्षा जास्त जण मरण पावले आहेत.

तालिबान निरपराध नागरिकांना मारत आहे. कुटुंबे, महिला आणि बालकांमध्ये बॉम्बस्फोट घडवले जात आहेत. दिवसरात्र हे मृत्यूचे थैमान सुरू आहे, असे ट्रम्प म्हणाले. या स्थितीत चर्चा केली जाऊ शकत नाही, असे त्यांनी सुचवले आहे. मात्र तालिबानच्या या कृतीला कसे प्रत्युत्तर द्यायचे याबाबत त्यांनी स्पष्टपणे काहीही सांगित्ले नाही. मात्र कठोर लष्करी प्रत्युत्तर देण्याचा त्यांचा बेत असणार हे निश्‍चित आहे. जे आतापर्यंत कोणालाही जमले नाही, ते करणे आता आम्हाला शक्‍य होईल. असेही ते म्हणाले.

अफगाणिस्तानमधून अमेरिकेने आपले सैन्य माघारी घेतल्यापासून तालिबानचे प्राबल्य वाढत चालले आहे. अफगाणिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी अमेरिकेचे दक्षिण आशियाबाबतचे धोरण लवकरच निश्‍चित होईल, असे संयुक्‍त राष्ट्रातील अमेरिकेच्या राजदूत निकी हेले यांनी सांगितले आहे.

काल काबुलमध्ये लष्करी तळावर इस्लामिक स्टेटनेही केलेल्या हल्ल्यामध्ये 11 सैनिक मारले गेले होते. 20 जानेवारीला तालिबानने काबुलमधील इंटरकॉन्टिनेन्टल हॉटेलवर हल्ला करून किमान 25 पर्यटकांना ठार केले होते. यामध्ये बहुतेक विदेशी पर्यटकच होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)