तालिबानने फेटाळला अफगाणिस्तानचा शांतिप्रस्ताव – हल्ले वाढवण्याची घोषणा

संग्रहित छायाचित्र

काबूल (अफगाणिस्तान) – तालिबानने अफगाणिस्तान सरकारचा शांतिप्रस्ताव फेटाळून लावला आहे. आपले हल्ले आणखी जोरदार करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. तालीबानने प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनानुसार ऑपरेशन अल-खंदकद्वारा अमेरिकन दले, त्यांचे गुप्तचर आणि त्यांना गुपचूप साह्य करणाऱ्यांना या हल्यांमध्ये निशाणा बनवण्यात येणार असल्याचे, त्यांना चिरडून टाकण्याचे, ठार करण्याचे आणि पकडण्याचे काम जोरात करणार असल्याचे तालिबानने उघड केले आहे.

अफगाणिस्तानमधील अमेरिकन लष्कराच्या उपस्थितीमुळे शांतीचे सर्व मार्ग बंदच होतात आणि युद्ध लांबत जाते असे तालिबानचे म्हणणे आहे. तालिबानचे हे निवेदन शांतिवार्ता ठोकरण्याचे मुख्य कारण आहे.

सामान्यत: हिवाळ्यात तालिबानीच्या कारवाया बंद होतात आणि हिवाळा संपताच पुन्हा चालू होतात. मात्र या वर्षी तालिबानींनी अमेरिकन आणि अफगाण लष्करावरचे हल्ले चालूच ठेवले होते.

या वर्षी तालिबानी अफगाण सरकारला अधिक कमजोर करण्याचा प्रयत्न करील, निवडणूक प्रक्रिया विस्कळित करण्याचा प्रयत्न करील असे अफगाणिस्तानचे राजकीय विश्‍लेषक आणि काबूल विद्यापीठाचे प्रो. अहमद सईदी यांनी म्हटले आहे, तर तालिबानची ही घोषणा म्हणजे केवळ दुष्प्रचार आहे, असे अफगाण लष्कराचे प्रवक्तेमोहम्मद रादमनीश यांनी म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)