तारिक अन्वर यांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी : काँग्रेसमध्ये दाखल 

राष्ट्रवादीचे माजी नेते आणि खासदार तारिक अन्वर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत काँग्रेसच्या गोटात सामील झाले आहेत. आज सकाळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी राफेल कराराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बाजू घेतल्याने नाराज झालेले तारिक अन्वर यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली. यासोबतच त्यांनी आपल्या खासदारकीचाही राजीनामा दिला आहे. आता काँग्रेसच्या तिकिटावर आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, तारिक अन्वर हे मूळचे काँग्रेसचेच आहेत. १९७६ मध्ये तारिक अन्वर बिहार युवा काँग्रेसचे अध्यक्ष बनले होते. यानंतर १९८० साली पहिल्यांदा काँग्रेसच्या तिकिटावर कटिहारमधून खासदार म्हणून निवडून आले होते. परंतु, १९९९ साली सोनिया गांधी यांच्या अध्यक्ष होण्याला विरोध करत शरद पवार यांच्यासोबत तारिक अन्वर बाहेर पडले होते. आता पुन्हा तब्बल १९ वर्षांनंतर तारिक अन्वर यांनी घरवापसी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)